रब्बी हंगामात यंदा 2000 हेक्टर अधिक लागवड

रब्बी हंगामात यंदा 2000 हेक्टर अधिक लागवड

rat२७p३.jpg
८५५४६
रत्नागिरीः रब्बी हंगामात लागवड केलेली पिके.
rat२७p४.jpg
८५५४७
शेतकऱ्यांना माहिती देताना कृषी विभागाचे अधिकारी

रब्बी क्षेत्रात दोन हजार हेक्टरने वाढ
कृषी विभाग; नदीकिनारी सर्वाधिक क्षेत्र, कडधान्यासह फुलशेतीला प्राधान्य
रत्नागिरी, ता. २७ः लांबलेला पाऊस, पडीक जमिनीच्या ठिकाणी बांधलेले कच्चे बंधारे आणि कृषी विभागाकडून वितरित करण्यात आलेल्या बियाण्यांमुळे यंदा रब्बी हंगामात गतवर्षीच्या तुलनेत दोन हजार हेक्टरवर अधिक लागवड झाली आहे. गतवर्षी नऊ हजार ३१ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा ११ हजार ०६९ हेक्टरवर रब्बी हंगामात कडधान्य, फुलशेतीसह अन्य लागवड झाली आहे.
कोकणामध्ये पाण्याचा अभाव असल्यामुळे रब्बी हंगामात लागवड करण्यावर कमी भर असतो. बहुसंख्य गावांमध्ये वायंगणी शेती म्हणजेच हिवाळ्यात करण्यात येणारी लागवड होते. गेल्या काही वर्षांमध्ये पडीक जमिनी रब्बी हंगामात लागवडीखाली यावीत यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न सुरू होते. यंदा आत्मा विभागाकडून सुमारे १६ हजार बियाण्यांची पाकिटे शेतकर्‍यांना देण्यात आली. त्याचबरोबर अनुदानावरही भाजीपाला, कडधान्य, फळभाज्या, फुलशेतीसाठी बियाणे दिली गेली. तसेच गावातील छोटे वहाळ, नद्या यावर बंधारे बांधून पाणी अडवण्यात आले. त्यामुळे किनारी भागामध्ये लागवड झालेले क्षेत्र अधिक असल्याचे कृषी विभागाचे निरीक्षण आहे.
कोरोनामध्ये घरगुती भाजीपाला विकून उदरनिर्वाह केल्याची अनेक उदाहरणे असल्यामुळे अनेक तरुणांनी, महिलांनी रब्बी हंगामात भाजी विक्रीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात भातशेती आटोपल्यानंतर त्वरीत अनेकांचा कल रब्बीतील लागवडीकडे होता. यामध्ये सर्वाधिक पालेभाजी २ हजार १०८ हेक्टर, कलिंगड ३४७ हेक्टर, फळभाजी २३० हेक्टर, कुळीथ २ हजार ५०७ हेक्टर, वाल १ हजार ६२२, पावटा १ हजार ५४२, चवळी ५४७, मूग ३४८ तर यंदा नव्याने लागवड केलेल्या मसुरची २१७ हेक्टरवर लागवड केली आहे. यंदा लागवड झालेल्या ११ हजार ०६९ हेक्टरपैकी कडधान्य ७ हजार २८४, भाजीपाला ३ हजार ५३७, तृणधान्य ५३.९२ तर ६७ हेक्टरवर गळीतधान्याचा समावेश आहे. राजापूर तालुक्यात ४३.६० हेक्टरवर ऊसाची लागवड केली गेली.

चौकट
फोटो - 85608

तालुकानिहाय लागवड क्षेत्र आकडेवारी
तालुका क्षेत्र (हेक्टर)
* मंडणगड ८४६
* दापोली ६९७
* खेड १,१२९
* गुहागर ५७६
* चिपळूण ८०३
* संगमेश्‍वर १७८४
* रत्नागिरी २९९५
* लांजा १२५१
* राजापूर १५३१

कोट
कृषी विभागाकडून जास्तीत जास्त लागवडीसाठी आवाहन केले होते. आवश्यक बी बियाणे, खते वितरित करतानाच मार्गदर्शनही केले होते. त्यामुळे यंदा रब्बीच्या लागवडीत वाढ झाली.
- विनोद हेगडे,
तांत्रिक अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com