पाण्याचा पहिला टॅंकर खेडमध्ये धावणार

पाण्याचा पहिला टॅंकर खेडमध्ये धावणार

rat२७६.txt

बातमी क्र. ६ (टुडे पान १ साठी)

पाण्याचा पहिला टॅंकर खेडमध्ये धावणार

पोसरेची प्रशासनाकडे धाव ; सर्वेक्षणानंतर पाणीपुरवठा करणार

खेड, ता. २७ : तालुक्यात पाणी टंचाईची चाहूल फेब्रुवारीच्या शेवटी जाणवू लागली असून तालुक्यातील पोसरे बुद्रुक–सडेवाडी येथे पाण्याचे दूर्भिक्ष्य निर्माण झाले असून पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली असून अर्जही दाखल केला आहे. यामुळे तालुक्यातील पहिला टँकर पोसरे बुद्रुक सडेवाडीत धावण्याची शक्यता आहे.
सर्वेक्षणानंतर टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे येथील पंचायत समितीकडून सांगण्यात आले.
गतवर्षी तालुक्यातील ऐनवली- बंगालवाडी येथे तालुक्यातील पहिला टँकर फेब्रुवारी महिन्यातच धावला होता. शिमगोत्सवातच ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोसरे बुद्रुक-सडेवाडी येथील नळपाणी योजना दरड दुर्घटनेत जमिनदोस्त झाली होती. यामुळे गतवर्षापासून ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला समोर जावे लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com