कलंबिस्त ग्रामपंचायतीत
उद्या शेतकरी मेळावा

कलंबिस्त ग्रामपंचायतीत उद्या शेतकरी मेळावा

कलंबिस्त ग्रामपंचायतीत
उद्या शेतकरी मेळावा

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २७ ः कलंबिस्त ग्रामपंचायत व पंचक्रोशी दुग्ध व्यवसायिक सहकारी संस्था मर्यादित, कलंबिस्त तसेच श्री देवी पावणाई रवळनाथ फार्मर प्रोड्युसर कंपनी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. १) मार्चला कलंबिस्त ग्रामपंचायत येथे सकाळी अकराला जिल्हास्तरीय कृषी पशुसंवर्धन शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा कृषी अधिकारी डी. एस. दिवेकर यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्‍घाटन होणार आहे. यावेळी ते कृषी विषयक माहिती व शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई, पशुधन सहाय्यक आयुक्त अजित मळीक हे पशुसंवर्धन योजनांबाबत माहिती देणार आहेत. नाबार्डचे जिल्हाधिकारी अजय थट्टे, ''गोकुळ''चे दूध संकलन अधिकारी अनिल शिखरे व विस्तार सुपरवायझर भगवंत गावडे तसेच जिल्हा बँकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पंचक्रोशीतील दुग्ध, शेती-बागायती शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना, सिंधुरत्न योजनेची माहिती तसेच जिल्हा बँकेकडून दूध उत्पादन, कुक्कुट पालन, मत्स्य शेती आदींबाबत मार्गदर्शन व कर्जवाटप याबाबत माहिती मेळाव्यात दिली जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सपना सावंत असून उपसरपंच सुरेश पास्ते व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत. पंचक्रोशीतील सर्व शेतकरी, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामसेवक फाले, दूध संस्थेचे अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, प्रोड्युसर कंपनीचे प्रमोद नाईक, दिनेश सावंत आदींनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com