
साखरपा पद्माकन्या शाळेत मराठी भाषा गौरव दिन
rat२७२४.txt
बातमी क्र. २४ (टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
rat२७p२०.jpg-
८५५९१
साखरपा ः कन्या शाळेमध्ये गीत सादर करताना विद्यार्थिनी.
--
साखरपा पद्माकन्या शाळेत मराठी भाषा गौरव दिन
पावस, ता. २७ ः संगमेश्वर तालुक्यातील साखरपा पद्माकन्या शाळा येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा झाला. पदवीधर शिक्षक यशवंत घागरे यांनी आजच्या दिवसाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक जाधव, पदवीधर शिक्षक घागरे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देणारे साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुषपहार अर्पण केला. राष्ट्रगीत गायन व जय जय महाराष्ट्र माझा हे गीत सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गौरव करणारी गीते, पोवाडे, कविता सादर केल्या. सहावीच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर केले. या वेळी व्यवस्थापन समिती अध्यक्षा मुग्धा जोगळेकर, उपाध्यक्ष विश्वनाथ शिंदे, सदस्या कदम, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.