
कणकवलीत ५ मार्चला संत रोहिदास जयंती
कणकवलीत ५ मार्चला संत रोहिदास जयंती
कणकवली, ता. २७ ः संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचा चौथा वर्धापनदिन, संत शिरोमणी रोहिदास यांची ६४५ वी जयंती व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा ५ मार्चला सकाळी १० वाजता येथील मराठा मंडळाच्या सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम, प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक मनोज हुमरसकर, संजय चव्हाण, राधानगरी पंचायत समितीचे उपसभापती रविश पाटील, गुंतवणूकदार सल्लागार अनिल चव्हाण, भागिरथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश भोईर, पत्रकार लक्ष्मीकांत भावे, संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या मुंबई महिलाध्यक्ष अॅड. हर्षा चौकेकर, राज्य सरचिटणीस प्रसाद मसूरकर, जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप बांबार्डेकर, महिला जिल्हाध्यक्ष रश्मी कुडाळकर आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी सांगली येथील लेखक तथा कवी डॉ. रवींद्र श्रावस्ती यांचे व्याख्यान होणार आहे. समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.