
‘स्वयंभू मित्रमंडळ’ क्रिकेटमध्ये विजेता
85605
‘स्वयंभू मित्रमंडळ’ क्रिकेटमध्ये विजेता
कणकवलीतील ‘स्टार महापुरुष’तर्फे स्पर्धा; गोरक्षनाथ संघ उपविजेता
कणकवली, ता. २७ : येथील स्टार महापुरुष मित्रमंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत स्वयंभू कणकवली संघ विजेता ठरला. गोरक्षनाथ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघाला पारितोषिक दिले. नगरपंचायतीच्या क्रीडा संकुल परिसरात ही स्पर्धा झाली.
उत्कृष्ट फलंदाज म्हणून सचिन दूखंडे (स्वयंभू), उत्कृष्ट गोलंदाज प्रथमेश परब (स्वयंभू), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विराज कदम (गोरक्षनाथ), उत्कृष्ट यष्टिरक्षक सौरभ भोजने (गोरक्षनाथ), अंतिम सामना सामनावीर सागर निवाते (स्वयंभू), मालिकावीर धनंजय दुखंडे (स्वयंभू) या खेळाडूंनाही मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. राज नलावडे, उद्योजक मेहुल धुमाळे, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, विजय इंगळे, हरिष उचले, चिंटू नार्वेकर, स्टार महापुरुष मित्रमंडळाचे अध्यक्ष सचिन चव्हाण, प्रथमेश चव्हाण, गिरीश चव्हाण, प्रद्युम मुंज, प्रदीप चव्हाण, रोहित चव्हाण आदी उपस्थित होते. पंच म्हणून सचिन चव्हाण, रोहन चव्हाण, प्रथमेश चव्हाण यांनी काम पाहिले. समालोचन बाळू वालावलकर, पुंडलिक तोडवळकर, रोहन कदम, योगेश मेस्त्री यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी दीपिकेश सदडेकर, सूभा घाडीगावकर, शिवाजी भिसे, ओंकार सुतार, प्रसाद चव्हाण, राकेश चव्हाण, उमेश आयरे, नागेश सूर्यवंशी, नारायण भिसे, दर्पण वणगे, मनीष वंजारे आदींनी मेहनत घेतली.