डोंगुर्ला तलाव मार्गावर स्वच्छता मोहीम
स्वच्छता मोहीम

डोंगुर्ला तलाव मार्गावर स्वच्छता मोहीम स्वच्छता मोहीम

८५६२५

डोंगुर्ला तलाव मार्गावर स्वच्छता मोहीम
मालवण ः भाजप युवा मोर्चा कार्यकर्ते गौरव लुडबे मित्रमंडळाच्या वतीने कुंभारमाठ डोंगुर्ला तलाव मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोठ्या प्रमाणात कचरा गोळा केला. या मार्गावर सातत्याने अज्ञात नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ बनत होता दुर्गंधी पसरत होती. मार्गावरून जाणारे नागरिक, विद्यार्थी यांनाही त्रास सहन करावा लागत होता. याप्रश्नी सामाजिक जाणिवेतून गौरव लुडबे मित्रमंडळाने स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छ केलेल्या परिसरात कोणीही कचरा टाकू नये असे आवाहन करताना ‘हय जो कचरो टाकतलो त्याचा वाटोळा होताला’ अशा मालवणी आशयाचा फलकही लावला आहे. उपसरपंच जीवन भोगावकर, ग्रामपंचायत सदस्य अनिता गावकर, विनय गावकर, विनोद भोगावकर, राजेंद्र लुडबे, गौरेश कांबळी, आरती लुडबे, हार्दिक महाजन, सुरज भानुशाली, मधु चव्हाण, राज झोरे, भिरु झोरे, सुयश चव्हाण, आदित्य डांगे, अमर सूर्यवंशी, अनिकेत जाधव, सचिन सावंत, राजू मराठे, पार्थ यादव, मनोहर सावंत, संदीप झोरे, वैशाली झोरे आदी उपस्थित होते.
--
मालवणात भाजपचा मार्गदशन मेळावा
मालवण : शहर भाजप युवा मोर्चाचा मार्गदर्शन मेळावा ३ मार्चला सायंकाळी पाचला दैवज्ञ भवन येथे आयोजित केला आहे. यात भाजप प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांचे प्रमुख मार्गदर्शन असणार आहे. रोजगाराच्या दिशा, शैक्षणिक धोरणातील बदल, यांसह संघटन वाढीच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे, अशी माहिती भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण यांनी येथे दिली. यावेळी युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर, निकित वराडकर, सरचिटणीस राकेश सावंत, निषय पालेकर, फ्रान्सिस फर्नांडिस, चंद्रकांत मयेकर आदी उपस्थित होते. या मेळाव्यात भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मंदार लुडबे, सुशांत घाडीगावकर, विक्रांत नाईक, नारायण लुडबे आदींची उपस्थिती असणार आहे. सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com