मराठी राजभाषा गौरव दिन बांदा केंद्रशाळेत उत्साहात

बांदा केंद्रशाळेत उत्साहात

मराठी राजभाषा गौरव दिन बांदा केंद्रशाळेत उत्साहात बांदा केंद्रशाळेत उत्साहात

फोटोसंक्षिप्त
८५६३५

मराठी राजभाषा गौरव दिन
बांदा केंद्रशाळेत उत्साहात
बांदा ः रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदातर्फे जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा क्रमांक १ येथे ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा केला. रोटरॅक्टच्या वतीने पहिलीतील ५० विद्यार्थ्यांना अंकलिपी व मराठी भाषिक कथांची पुस्तके वाटप केली. मुलांना खाऊचे वाटप केले. मुलांनी मराठी भाषिक कविता, भाषण, समूहगीत सादर केले. स्वरचित कविता सादर करणाऱ्‍या सर्वज्ञ वराडकर, दुर्वा नाटेकर, नैतिक मोरजकर व हर्ष नाईक यांना रोटरॅक्टच्या वतीने विशेष कथा पुस्तके देऊन सन्मानित केले. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील कविता साभिनय सादर करून सर्वांची मने जिंकली. यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ, बांदाचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सचिव अवधूत चिंदरकर, दत्तराज चिंदरकर, रोहन कुबडे, मुईन खान, अंजली सावंत व जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, उपशिक्षक जे. डी. पाटील व शिक्षक उपस्थित होते. रोटरॅक्ट बांदाने राबविलेल्या या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलेश मोरजकर व पालकांनी कौतुक केले.
--
तळेरे येथे आज विविध कार्यक्रम
तळेरे ः येथील रिक्षा संघटनेच्या वतीने उद्या (ता. २८) वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रात्री ‘गीतगंध’ हा बहारदार मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी नऊला महापूजा, दहाला गोवळ-गावठण येथील श्री पावणादेवी ढोलपथक यांचे ढोलवादन, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी तीन ते पाच दरम्यान हळदीकुंकू, सायंकाळी पाचला नवनियुक्त सरपंच व पंचक्रोशीतील माध्यमिक विद्यालयांतील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सायंकाळी साडेसहाला श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, तळेरे-गावठणचे बुवा संतोष तळेकर यांचे सुश्राव्य भजन, रात्री आठला मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम ‘गीतगंध’ कार्यक्रम होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com