विज्ञानातून करिअर संधी मालिका

विज्ञानातून करिअर संधी मालिका

rat२७३६.txt

बातमी क्र. ३६ (पान २ साठी, अॅंकर)

विज्ञानातून करिअर संधी--भाग- ३--लोगो

गणितातही करिअरसाठी अवकाश मोकळे

गणिताचा अभ्यास हा पाया ;माहितीच्या विश्लेषणाचा आधार


मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : आपल्या रोजच्या जीवनात पदोपदी गणिताची गरज लागतेच. ज्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय आवडतो अशा सर्व विद्यार्थ्यांना या विषयात करिअरच्या अनेक संधी आहेत. विज्ञानतही विविध विषयांचा अभ्यास करताना गणिताचा अभ्यास हा पाया समजला जातो. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलविज्ञान विषयाप्रमाणेच गणित विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे जाऊन मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
गणित विषयाचे तज्ज्ञ आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे निवृत्त गणित विभागप्रमुख प्रा. डॉ. राजीव सप्रे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी गणित विषयातील संधी उलगडून सांगितल्या. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर गणिताच्या विविध स्पर्धा परीक्षा होत असतात. त्यात विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. वैदिक गणित याविषयीही डॉ. सप्रे मार्गदर्शन करतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गणिताचे मार्गदर्शन व संकल्पना उलगडून सांगण्यासाठी त्यांनी युट्यूबवरून अनेक व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यामुळे देशभरातून अनेकजण त्याचा लाभ घेत आहेत.
डॉ. सप्रे म्हणाले, विविध प्रयोग करताना, माहितीचे विश्लेषण करताना वैज्ञानिक गणिताचा आधार घेतात. गणिती सूत्रे वापरूनच वैज्ञानिक अंदाज वर्तवले जातात. खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या शास्त्रांचा अभ्यास गणिताविना अपुरा आहे. सामाजिक शास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र हे विषय गणिताची शाखा असणाऱ्या सांख्यिकी (स्टॅटिस्टिक्स) आणि इतर विषयांवर अवलंबून असतात. अर्थशास्त्रज्ञ वेगवेगळी प्रारूपे करण्यासाठी इकॉनॉमेट्रिक्सचा ( गणिताचीच एक शाखा) वापर करतात. गणिती सूत्र, कॉम्प्युटेशनल टेक्निक्स, अल्गोरिदम्स आणि संगणक शास्त्राचा अभ्यास करून गणिततज्ज्ञ अर्थशास्त्रीय, वैज्ञानिक, अभियांत्रिकी, भौतिकशास्त्र, वैद्यकीय शास्त्र तसेच व्यवसायासंबंधी अनेक समस्यांची उकल करतात.
अॅक्चुरिअल सायन्स या शास्त्राला विमाविज्ञान म्हणतात. कोणत्याही कंपनीला त्यांचे आर्थिक नियोजन करावेच लागते. विविध विमा पॉलिसी व त्यातील विविध शर्ती, अटी ठरवण्यासाठी विमा विज्ञानाचा वापर करतात. विमाशास्त्रज्ञ ही गणिताच्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट संधी आहे, असे डॉ. सप्रे यांनी आवर्जून सांगितले.
संगणकाच्या प्रगतीमुळे आता ई बुक्स वापरावर भर आहे. गणित या विषयाची ई बुक्स तयार करणाऱ्या कंपनीमधून गणिताच्या विद्यार्थ्यांना नोकरी संधी उपलब्ध आहे. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये गणित चांगले शिकवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षक होण्याची संधी मिळते. तसेच आता ऑनलाइन शिकवणी वर्ग भरतात आणि हे एक मोठे दालन गणिताच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे.
(समाप्त)
-

करिअरच्या संधी
गणिताची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर, इन्शुरन्स, मार्केट रिसर्च, शिक्षण, सिक्युरिटीज, बॅंका, अर्थशास्त्र, अभियांत्रिकी, संगणकशास्त्र, शिक्षण आणि इतर अनेक शाखांमध्ये करिअर करण्याची संधी मिळू शकते. भारतातील अंतराळ संशोधन, संरक्षण संशोधन, हवाई (विमान विषयक) संशोधन या संस्थांमध्ये त्यांच्या कामाच्या समस्या सोडवण्यासाठी गणिताच्या पदवीधरांची नियुक्ती केली जाते, असे डॉ. राजीव सप्रे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com