सती शाळेत सर्वार्धिक पुस्तक वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सती शाळेत सर्वार्धिक पुस्तक वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव
सती शाळेत सर्वार्धिक पुस्तक वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव

सती शाळेत सर्वार्धिक पुस्तक वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव

sakal_logo
By

rat२७४३.txt

बातमी क्र. ४३ (पान २ साठी)

फोटो ओळी
-ratchl२७४.jpg -
८५६४२
चिपळूण ः वाचकवीर पुरस्काराने विद्यार्थ्यांचा सन्मान करताना मुख्याध्यापक अरविंद सकपाळ व सहकारी शिक्षिका
--

सती शाळेत वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव

चिपळूण, ता. २७ ः सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) विद्यालयात मराठी भाषेचा गौरव दिन उत्साहात झाला. महिनाभरात सर्वाधिक पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचकवीर पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराष्ट्र गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. शिक्षिका रश्मी मोरे व मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांनी मराठी भाषेविषयी मोलाची माहिती सांगितली. वाचकवीर पुरस्कारामध्ये लहान गटात आरोही निर्मळ व साश्रिक ठसा, मोठ्या गटात मनस्वी चव्हाण, वाचन स्पर्धेत आरोही निर्मळ, सानिक ठसाळे, शौर्य पोटे, दुर्वाक शिंदे, सान्वी दवंडे, मयुरेश पारवे, रूद्र खरात, वीर कांबळे, हर्ष मोडक, अन्वी मोडक, नमित कनावजे, निधी चव्हाण, समर्थ लाड, श्लोक मादगे, स्वरा गायकवाड या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देवून सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन रश्मी राजेशिर्के, आभार वर्षा सकपाळ यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक अरविंद सकपाळ, शिक्षिका मनीषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिंदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, रूपाली खरात, ज्योती चाळके, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण यांनी विशेष मेहनत घेतली.