राजापुरातील 20 ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगूल

राजापुरातील 20 ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगूल

राजापुरातील २० ग्रामपंचायत
निवडणुकांचा वाजणार बिगूल
राजापूर, ता. २७ : विविध कारणांमुळे ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदांच्या रिक्त असलेल्या जागांच्या पोटनिवडणूका घेण्याच्या हालचाली प्रशासनस्तरावर सुरू झाल्या आहेत. या संभाव्य निवडणुकीच्या अनुषंगाने महसूल प्रशासनाने त्या-त्या गावांमध्ये प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये तालुक्यातील वीस ग्रामपंचायतींचा समावेश असून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्धीमुळे तालुक्यात शिमगोत्सवामध्ये किंवा त्यानंतर ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकांचा धुरळा उडण्याची शक्यता आहे.
विविध कारणांमुळे थेट सरपंचपदासह ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या जागा रिक्त राहीलेल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या जागांवर पोटनिवडणूका घेण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाकडून प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार याद्यांवर २ मार्चपर्यंत हरकती वा सूचना दाखल करावयाच्या असून त्यावर योग्य तो निर्णय होवून त्यानंतर ९ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

चौकट
पोटनिवडणूकीच्या संभाव्य ग्रामपंचायती
कोळवणखडी, नाणार, झर्ये, शेजवली, ओझर, हसोळतर्फ सौंदळ, वडदहसोळ, येळवण, नाटे, दसूर, वाल्ये, पांगरीखुर्द, गोवळ, पन्हळेतर्फ सौंदळ, अणसुरे, दळे, चिखलगाव, मंदरूळ, जवळेथर, काजिर्डा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com