वायंगणीत ४ मार्चला
हिंदू राष्ट्र जागृती सभा

वायंगणीत ४ मार्चला हिंदू राष्ट्र जागृती सभा

वायंगणीत ४ मार्चला
हिंदू राष्ट्र जागृती सभा
मालवण, ता. २७ ः हिंदूवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी तसेच हिंदूंच्या प्रभावी संघटनासाठी हिंदु जनजागृती समितीतर्फे ४ मार्चला सायंकाळी पाचला वायंगणी (ता.मालवण) येथील ज्ञानदिप माध्यमिक विद्यालयाच्या पटांगणावर हिंदू राष्ट्र जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे हेमंत मणेरीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रेवतळे येथे फाटक यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी दिनानाथ गावडे, राजन सकपाळ, मंदार सांबारी आदि उपस्थित होते. श्री. मणेरीकर म्हणाले, ‘‘या सभेला सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडये, हिंदू जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक मनोज खाड्ये आणि हिंदु जनजागृती समितीचे अधिवक्ता संघटक नीलेश सांगोलकर हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या सभेचा मालवण, कणकवली, देवगड या तालुक्यातून प्रचार सुरू आहे. गेले महिनाभर विविध मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. या सभेच्या प्रचारासाठी २७ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता आचरा येथे भव्य वाहन फेरी काढण्यात येणार आहे. या वाहनफेरीचा प्रारंभ श्री देव रामेश्वर मंदिर येथे होणार असून आचरा तिठा, बाजारपेठ, हिर्लेवाडी, वायंगणी, स्वामी समर्थ मठ, आचरा हायस्कूल मार्गे आचरा तिठा आल्यावर सांगता होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com