रत्नागिरी-क्राईम

रत्नागिरी-क्राईम

rat२७१५. txt

(पान ३ साठी)

भाट्येत रिक्षाचा अपघात, चालकाचा मृत्यू


रत्नागिरी, ता. २७ ः रत्नागिरी ते पावस रस्त्यावर भाट्ये येथे अपघात करून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या रिक्षा चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित रविंकात रांदपकर (वय ४५, रा. भाटीमिऱ्या, रत्नागिरी) असे मृत चालकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २४) रात्री पावणे नऊच्या सुमारास भाट्ये चेकपोस्ट नजीक घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रोहित रांदपकर हे प्रवासी रिक्षातून रत्नागिरी पावस रस्त्यावरुन कुर्ली ते रत्नागिरी असे जात होते. भाट्ये पेलिस चेक पोस्ट येथे रिक्षा निष्काळजीपणे चालवून लोखंडी बॅरेकेटला जोरदार ठोकर दिली. या ठोकरीत रिक्षा उलटली. या अपघातात रांदपकर गंभीर जखमी झाले. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिस हवालदार प्रवीण बेंदरकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
--
गावठी दारु बाळगणाऱ्याविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी ः शहरातील मुरुगवाडा येथील सार्वजनिक ठिकाणी हातभट्टीची गावठी दारु बाळगणाऱ्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल अलीसाहब मुजावर (वय ३३, रा. मुरुगवाडा-झोप़डपट्टी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (ता. २६) रात्री पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुजावर यांच्याकडे सार्वजनिक ठिकाणी गावठी हातभट्टीची दारु ताब्यात बळगलेल्या स्थितीत सापडले. या प्रकरणी पोलिस नाईक संतोष करळकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.
-
औषध प्राशन केलेल्या वृद्धेचा मृत्यू

रत्नागिरी ः तालुक्यातील कळझोंडी येथील वृद्ध महिलेने आंबा फवारणीचे औषध प्राशन केले. उपचारासाठी खंडाळा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. संगिता गंगाराम सनगरे (वय ६५, रा. कळझोंडी- कुणभेवाडी, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २५) सायंकाळी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संगिता सनगरे यांचा मुलगा व तिचे पती वाडीतील मिटींगला गेले होते. त्यावेळी घरातून फोन आला की आई कशीतरी करत आहे. लागलीच मुलगा घरी आला पाहिले तर त्यांच्या आईच्या तोंडाला औषधाचा वास येत होता. तत्काळ त्याने आईला खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तिथून अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी मुलाने जयगड पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
--
होळी आणण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी ः होळी आणण्यासाठी ट्रक मधून नेवरे येथे जात असताना साखरतर येथे भोवळ आलेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विजय शामराव काजवे (वय ५६, रा. अथर्व कॉम्प्लेक्स पऱ्याची आळी, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काजवे व इतर ३० जणांसह ट्रक मधून पऱ्याची आळी ते नेवरे असे जात होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास साखरतर येथे काजवे यांना भोवळ आल्याने ते ट्रकच्या हौद्यात खाली बसले. ट्रकमधील इतर सहकाऱ्यांनी त्यांना कासारवेली येथी डॉक्टरकडे नेले असता त्याने अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. सायंकाळी सहा वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
---
दागिने चोरणाऱ्याला न्यायालयीन कोठडी

रत्नागिरी ः शहरातील खालचा फगरवठार येथील घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ३ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल पळविणाऱ्या संशयित तरुणाला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. विजय राजाराम वाळवे (वय ३४, रा.खालचा फगरवठार, रत्नागिरी ) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार २० ते २४ फेब्रुवारीला सकाळी आठ या कालावधीत घडला होता. संशयिताविरुद्ध प्रज्ञा परशुराम पाष्टे (वय ४७,रा. खालचा फगरवठार, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार विजयने त्यांच्यावर पाळत ठेऊन त्या घराबाहेर गेल्यानंतर खिडकीला लावलेल्या छत्रीमधील चावी घेऊन घराचे कुलूप उघडले. त्यानंतर घरातील लॉकरमधून सोन्याचे मंगळसूत्र, नेकलेस, अंगठ्या, चेन, कर्णफूल आणि रोख १० हजार रुपये असा एकूण ३ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी विजय अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
---
नाखरेतील दारु विक्री करणाऱ्यावर कारवाई

पावस ः तालुक्यातील नाखरे-कालकर कोंड येथे तरुण हातभट्टीची दारू विक्री करताना सापडला. पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पांडुरंग कालकर (वय ३२, रा. कालकरकोंड-नाखरे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (ता. २६) सायंकाळी निदर्शनास आला. पोलिसांनी त्याच्याकडून दारुसह इतर साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलिस हवालदार राजेंद्र सावंत यांनी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
--
कंटेनरमधून औषधाचे बॉक्स चोरीस

खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील जांबुर्डे नजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरमधून अज्ञात चोरट्यने औषधाचे बॉक्स चोरून नेले. हा प्रकार शनिवारी (ता. २५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास निदर्शनास आला. या प्रकरणी मोहमद जोहुल अन्सारी (वय ३४, रा. गोवंडी, मुंबई) या कंटेनर चालकाने येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कंटेनर जांबुर्डे शाळेच्या जवळ मुंबई महामार्गाचे बाजूला उभा करून चालक अन्सारी झोपला होता. त्यावेळी अज्ञात चोरट्याने कंटेनरच्या दरवाजाचे कुलूप तोडून कंटेनरमध्ये असणारे एकूण ४६८ औषधांचे बॉक्सपैकी औषधांचे एकूण१०१ बॉक्सची चोरी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--

रिक्षातून दारूची वाहतूक

लांजा ः रिक्षातून गावठी हातभट्टीच्या दारूची वाहतूक करणाऱ्याला लांजा पोलिसांनी गस्तीदरम्यान वाटूळ- दाभोळे मार्गावर व्हेळ फाटा येथे ताब्यात घेतले आहे. या घटनेत पोलिसांनी रिक्षात सापडलेला १७५ लिटरचा गावठी हातभट्टीचा ९७५० रुपयाचा दारू साठा जप्त केला आहे. शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी पोलिस वाटूळ-दाभोळे मार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी भांबेडच्या दिशेने आलेल्या रिक्षाचा संशय आल्याने पोलिसांनी या रिक्षाची तपासणी केली. तपासणीमध्ये पोलिसांना रिक्षामध्ये १७५ लिटरचा गावठी हातभट्टीचा दारूसाठा आढळून आला. रिक्षाचालक संशयित राजकुमार सुर्वे याच्यावर लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com