
देवगड आगारास सव्वासात लाख उत्पन्न देवगड आगारास सव्वासात लाख उत्पन्न
देवगड आगारास सव्वासात लाख उत्पन्न
कुणकेश्वर यात्रा सेवा ः ४७१ फेऱ्या; २२ हजार ५५५ प्रवाशांची वाहतूक
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेत येथील आगाराला सुमारे ७ लाख २९ हजार ६६७ रुपये एवढे उत्पन्न सवलत मुल्यासह प्राप्त झाले. यासाठी येथील शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून २८ गाड्या कार्यरत होत्या.
यंदा तीन दिवस यात्रा होती. यात्रा कालावधीत एकूण १६.२१४ किलोमीटर अंतर कापून ४७१ प्रवासी फेऱ्यांमधून २२ हजार ५५५ प्रवाशांची वाहतूक झाली. यातून आगाराला सुमारे ७ लाख २९ हजार ६६७ रुपये एवढे उत्पन्न सवलत मुल्यासह प्राप्त झाले. आगारातून सर्वाधिक उत्पन्न चालक ए. के. इंदप आणि वाहक व्ही. आर. सावंत यांनी १७ फेऱ्यांमधून ९०२ किलोमीटर अंतर कापून ४२ हजार ४ रुपये आणले. चालक एस. यू. बटवाले आणि वाहक जे. एस. ढबाले यांनी २६ फेऱ्यांमधून ९६७ किलोमीटरमधून ४१ हजार ६२९ रुपये, चालक डी. डी. जंगले आणि वाहक एस. के. पवार यांनी २६ फेऱ्यांमधून ९९१ किलोमीटरमधून ३२ हजार ८४२ रुपये, चालक ए. एल. इंदप आणि वाहक एस. एस. साटम यांनी २२ फेऱ्यांमधून ९२४ किलोमीटरमध्ये ३१ हजार ६०५ रुपये, तर चालक एस. सी. माळवदे आणि वाहक एस. एस. कोकरे यांनी ३१ फेर्यांमधून ८११ किलोमीटरमधून २९ हजार २६ रुपये एवढे उत्पन्न आणले. विभाग नियंत्रक प्रशांत वासकर, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख, उपयंत्र अभियंता श्री. डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक नीलेश लाड, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतावडेकर, सहायक वाहतूक निरीक्षक लवू सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक नियंत्रक, कार्यशाळा अधीक्षक आणि कर्मचारी, वाहन परिक्षक तसेच लेखाधिकारी, लिपिक, चालक वाहक यांनी यात्रोत्सव यशस्वीपणे झाला.