हर्णै-हर्णैच्या आरव गोळेचा जलतरणात झेंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्णै-हर्णैच्या आरव गोळेचा जलतरणात झेंडा
हर्णै-हर्णैच्या आरव गोळेचा जलतरणात झेंडा

हर्णै-हर्णैच्या आरव गोळेचा जलतरणात झेंडा

sakal_logo
By

rat२७p२८.jpg-
८५६६९
मुंबईः धरमतर ते गेट वे ऑफ इंडियाचे अंतर पार केल्यानंतर आरवचा सत्कार करण्यात आला.
-------------
हर्णैच्या आरव गोळेचा जलतरणात झेंडा
‘धरमतर ते गेट वे’ ३९ किमी पल्ला ८ तास ४० मिनिटांत पार; सहा महिने सराव
हर्णै, ता. २७ः मुळचा दापोली तालुक्यातील हर्णै येथील परंतु सध्या वास्तव्यास डोंबिवली येथे असणाऱ्या आरव गोळेन अवघ्या दहाव्या वर्षी ‘धरमतर ते गेट वे’चा ३९ किमीचा पल्ला ८.४० तासात पोहत पार केला असून सर्वच स्तरांतून त्याच कौतुक होत आहे. इतक्या लहान वयात हा पराक्रम करणाऱ्या मोजक्या मुलांमध्ये आरव जाऊन बसला आहे. मंगळवारची मध्यरात्र उलटून गेल्यावर दीडच्या सुमारास धरमतरच्या समुद्रात उडी मारलेल्या आरवचे पाय आठ तासांनी साडेनऊच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाच्या किनाऱ्याला लागले.
गेल्या सहा महिने घेत असलेल्या परिश्रमांचे चीज झाल्याची भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. गेले सहा महिने कल्याण डोंबिवली, नवी मुंबई व मुंबई परिसरातील विविध सागरी किनाऱ्यांवर रोज सहा सात तास ओपन सी स्विमिंगचा सराव करणाऱ्या आरवनं हा पराक्रम करत हर्णै व डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. तिसऱ्या वर्षी पोहायला शिकलेल्या आरवनं स्विमिंगमधलं व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास पाचव्या वर्षी सुरवात केली. सातव्या वर्षी विविध ठिकाणच्या पोहण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरवात केलेल्या आरवनं समुद्रामध्ये पोहण्याची तयारी मात्र सहा महिन्यांपूर्वीपासून सुरू केली. २०२२ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय ओपन सी स्विमिंग स्पर्धेमध्ये आठव स्थान पटकावत खुल्या समुद्रात पोहण्यात असलेले प्रभूत्व त्याने सिद्ध केले. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सनरॉक ते गेट वे ऑफ इंडिया या ५९व्या लाँग डिस्टन्ससी स्विमिंग स्पर्धेतही पाचवे स्थान आरवने पटकावले.
राजेश गावडे, मितेश पाटोळे आणि विशेष करून किशोर पाटील या अनुभवी प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण आणि डोंबिवली जिमखान्याच्या दिलीप भोईर यांच्या मार्गदर्शनाचा धरमतर ते गेटवेचं शिवधनुष्य पेलण्यासाठी प्रचंड फायदा झाला. आरवच्या शाळेने म्हणजेच विद्यानिकेतन शाळेने सदैव त्याला प्रोत्साहन दिले आहे. शाळेने आरवला सकाळी सुद्धा सराव करता यावा या निमित्ताने त्याला दिलेली अर्ध्या दिवसाची सवलत खूपच मोलाची ठरली. आरवच्या या पराक्रमाचे कौतुक करण्यास स्वतः शाळेचे संस्थापक विवेक पंडित गेट वे ऑफ इंडियाला आले होते. त्यांनी आरवला त्याच्या पुढील ध्येयासाठी वाटचाल करण्यास शुभेच्छा दिल्याचे आरवचे वडील अद्वैत गोळे यांनी सांगितले.