
दुचाकींच्या अपघातात तिघे जखमी
दुचाकींच्या अपघातात तिघे जखमी
सावंतवाडी ः माजगाव येथे दोन महाविद्यालयीन युवकांच्या दुचाकीमध्ये झालेल्या विचित्र अपघातात तिघे महाविद्यालयीन युवक जखमी झाले आहेत. त्यातील एकाला गंभीर दुखापत झाली. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास माजगाव-मेटवाडा येथे शिरोडा-सावंतवाडी राज्यमार्गावर ही घटना घडली. हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दुचाकीस्वार नेहमीप्रमाणे आज सकाळी दुचाकीवरून गप्पागोष्टी करत महाविद्यालयात जात होते. मात्र, बोलत असताना गाडीचा हँडल दुसऱ्या गाडीमध्ये अडकला आणि तिघेही दुचाकींसह उंच उडून खाली पडले. यात ते जखमी झाले, तर एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्याचे समजताच त्या ठिकाणी राहणारे गंगाराम नाईक, राजेश नाईक यांनी तातडीने धाव घेऊन तिघांनाही जवळच्याच रुग्णालयात त्यांना दाखल केले.