गद्दारांना क्षमा करणार नाही

गद्दारांना क्षमा करणार नाही

85678
वेंगुर्ले ः अॅड. जी. जी. टांककर यांनी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

गद्दारांना क्षमा करणार नाही

सुभाष देसाई ः वेंगुर्लेत ‘शिवगर्जना’ मेळावा उत्साहात

वेंगुर्ले, ता. २७ ः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शुन्यातून उभ्या केलेल्या शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्न आज हे गद्दार करीत आहेत. बाळासाहेबांनी उध्दव व आदित्य यांना महाराष्ट्रातील शिवसैनिकांना सांभाळा, असे कळकळीचे आवाहन केले होते. त्यावेळी हे गद्दारी करणारे त्याठिकाणी होते. त्यांनी बाळसाहेबांचा शब्द मानला नाही. त्यांच्या या पापाला क्षमा नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांनी येथे केले.
भाजपचे डावपेच यांच्या बापजाद्यालाही समजणार नाहीत. यांना वापरून ते फेकून देतील. गद्दारी शिवसेनेत यापुर्वीही झाली होती. ते सर्व आज भाजपच्या कळपात आहेत. येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता व शिवसैनिक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.
येथील साईमंगल कार्यालय येथे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे शिवगर्जना मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रदिप बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, अतुल रावराणे, अतुल बंगे, महिला संपर्क प्रमुख स्नेहा माने, बाळा गावडे, तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, तालुका महिला संघटक सुकन्या नरसुले, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, विवेक आरोलकर, मंजुषा आरोलकर, उभादांडा सरपंच निलेश चमणकर आदी उपस्थित होते.
श्री. देसाई पुढे म्हणाले, ‘‘गद्दारांचा शिरोमणी असलेल्या दीपक केसरकर यांच्या मतदार संघात शिवगर्जना मोहीमेची ही पाचवी सभा होत आहे. केसरकरांचे शिवसेनेत असताना तोंडही उघडत नव्हते. आता गद्दारांचे प्रवक्ते झाल्यानंतर त्यांची पोपटपंची सुरु झाली आहे. ते दलबदलू आहेत. यानंतरची त्यांची उडी ही भाजपमध्ये असणार आहे. आज सर्व गद्दार एकत्र झाले आहेत. मुळात हे गद्दार मूळचे शिवसेनेचे नाहीत. बाळासाहेबांनी शुन्यातून शिवसेना उभी केली. ती शिवसेना संपविण्याचा प्रयत्न हे गद्दार करीत आहेत. मात्र, शिवसेना संपणार नाही. निष्ठावान शिवसैनिक आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता व निष्ठावान शिवसैनिक या गद्दारांना धडा शिकवतील.’’
कोरोना काळात उद्धव ठाकरे सरकारने केलेले काम, पक्षाचे विचार घेवून आपल्याला तळागाळापर्यंत गेले पाहीजे. पुन्हा एकदा आपला भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रदिप बोरकर यांनी केले. यावेळी अॅङ जी. जी. टांककर यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मी पूर्वी शिवसेनेत होतो. मात्र, २०१६ मध्ये केसरकर यांच्याकडून आपली गळचेपी झाल्याने मी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपवाले जसे सांगतात, त्याप्रमाणे काहीच करीत नाहीत, असा अनुभव आल्याने पुन्हा शिवसेनेत आलो असल्याचे अॅङ. टांककर यांनी सांगितले. यावेळी उपतालुका प्रमुख पदी तुकाराम परब, विभाग प्रमुखपदी संदिप पेडणेकर (वजराठ), उप विभाग प्रमुखपदी रविंद्र राऊळ, युवासेना उपशहर प्रमुखपदी वैभव फटजी, युवासेना शहर समन्वयकपदी कौशल मूळीक, उपशहर प्रमुखपदी शैलेश परुळेकर, मागासवर्गीय सेलच्या महिला शहर संघटिका म्हणून जाधव, महिला अल्पसंख्याक प्रमुखपदी अस्मित शेख, वेंगुर्ले शाखा संघटकपदी अंकिता केरकर, हर्षदा तुळसकर, तुळस उप संघटकपदी नयना धुरी यांना श्री. देसाई यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. तालुका प्रमुख यशवंत परब यांनी प्रास्ताविक केले. उपतालुका प्रमुख संजय गावडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com