उद्योजकांना 35 टक्के वीज दरवाढ अमान्य

उद्योजकांना 35 टक्के वीज दरवाढ अमान्य

३५ टक्के वीज दरवाढ अमान्य
डॉ. प्रशांत पटवर्धन; उद्योजकचा १५ वर्षांपासून लढा सुरू
चिपळूण, ता. २७ः कच्च्या मालाचे वाढलेले दर आणि काहीसे मंदीचे सावट असताना आता होणारी ३५ टक्क्यांची दरवाढ आम्हा उद्योजकांना परवडणारी नाही. इतकी दरवाढ झाल्यास उद्योग सुरू ठेवणे जमणार नाही. ‘महावितरण''ने क्रॉस अनुदान रद्द केल्यास आपोआप एक ते दोन रुपयांनी वीजदर कमी होतील. त्याचा विचार राज्य सरकारने करावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा उद्योजक फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी केली आहे.
पटवर्धन यानी प्रस्तावित दरवाढीबाबत उद्योजकांची भूमिका मांडताना ते म्हणाले, अनेक वर्षापासून विविध औद्योगिक संघटना वीज दरवाढीविरोधात लढा देत आहेत. न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील. यंदाच्या प्रस्तावित दरवाढीविरोधात लवकरच आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमधील उद्योजकांचा वीज दरवाढीविरोधात १५ वर्षांपासून लढा सुरू आहे. निवेदन, चर्चा, मोर्चा, दरवाढीच्या प्रस्तावाची प्रतिकात्मक होळी, लाक्षणिक बंदच्या माध्यमातून त्यांनी वीज दरवाढ कमी करण्याच्या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. मात्र अजूनही त्यांना या दराबाबत दिलासा मिळालेला नाही. रोजगार निर्मिती करणाऱ्या आणि अर्थचक्राला गती देणाऱ्या उद्योगक्षेत्र टिकविण्यासाठी वीज दरवाढ रद्द करावी, अशी आग्रही मागणी उद्योजकांनी पुन्हा एकदा केली आहे.
उद्योग क्षेत्रातील कच्चा माल, मनुष्यबळापाठोपाठ वीज हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. या विजेच्या दरावर त्यांचा उत्पादन खर्च अवलंबून असतो. त्यात वाढ झाली, की त्यांचे आर्थिक नियोजन बिघडते. गुणवत्तापूर्ण आणि वेळेत उत्पादन देण्यात रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजक आघाडीवर आहेत मात्र त्यांना वाढत्या आणि महाराष्ट्र शेजारील गुजरात राजस्थान सह अन्य राज्यांच्या तुलनेत वीजदर अधिक असल्याने स्पर्धेत टिकून राहणे अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे वीज दरवाढीला विरोध करणारे पत्र आम्ही तयार केले आहे. सुनावणीच्यावेळी ते सादर करू, असे डॉ. पटवर्धन यांनी सांगितले.

चौकट
उद्योजकांच्या मागण्या
- उद्योगांवरील क्रॉस सबसिडी रद्द करा.
- सुनावणीवेळी उद्योजकांना संधी द्यावी
- प्रतियुनिट एक रुपया सवलत द्या
- कमी दरातील वीज वापरास परवानगी द्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com