
-बनवाट दस्तावेजाधारे जमीन मालकाची फसवणूक
rat२७५१.txt
बातमी क्र. ५१ (पान ३ साठी)
बनवाट दस्ताआधारे जमीन मालकाची फसवणूक
देवरुखातील प्रकार ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
देवरूख/रत्नागिरी, ता. २७ ः देवरूख (ता. संगमेश्वर) येथे जमिनीचे बनावट दस्तावेज आणि नोटरी तयार करुन वृध्दाची फसवणूक करणाऱ्या बिल्डरसह सहा जणांविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश गंगाराम शिवगण (रा. दादर, मुंबई), संतोष पांडुरंग कदम (रा. दादर, मुंबई), अनंत दत्ताराम रहाटे (काळाचौकी, मुंबई), हरेश रामचंद्र मांजरेकर (रा. परेल, मुंबई), तेजस बदियानी (रा. पनवेल) आणि नोटरी करणाऱ्या वकिल सुनीता राम पाटील (रा. बेलापूर, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले, की जमीन मालक चंद्रकांत शंकर लिंगायत (वय ६१, रा. देवरूख पोलिस वसाहत समोर, देवरूख) यांनी तक्रार दिली आहे. देवरुख येथील त्यांनी खरेदी खताना १२ गुंठे जमिन विकत घेतली होती. ही जमीन १६ मे २०१८ ला त्यांनी यश डेव्हलपर्सला विकसित करण्यासाठी दिली होती. मात्र संशयितांनी लबाडीने हेतूपूर्वक ड्राफ्ट व नोंदणी केलेला दस्त यामध्ये तफावत केली. या प्रकरणी लिंगायत यांनी पुन्हा डेव्हलपेमेंट अॅग्रीमेंट करण्याचा सल्ला विकासकाला दिला. त्यानंतर प्रत्यक्ष काम करण्यासाठी मुख्यत्यारपत्र दिले जाईल असे लिंगायत यांच्याकडून विकासकाला बजावण्यात आले होते.
जमीन मालक असलेल्या चंद्रकांत लिंगायत यांच्याकडून काम करण्यासंदर्भात मुखत्यारपत्र न घेता यश डेव्हलपर्स यांनी प्रत्यक्ष कामाला सुरवात केली. या बाबत जमीन मालक लिगायत यांनी तपासणी केली असता १४ जून २०१९ ला फॉर्म बी अॅफिडेव्हिट कम डिक्लेरेश अशा मजकुरावर खोटी सही केलेला दस्त महाराष्ट्र इस्टेट अॅथॉरिटीवर (महारेरा) अपलोड केला असल्याचे आढळून आले. जमीन मालक म्हणून आपली बनावट सही करून प्रोजेक्टला आपली मान्यता असल्याचे भासवून रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र प्राप्त करुन घेतले अशी तक्रार त्यांनी देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस अमंलदार करत आहेत.
--