Thur, March 23, 2023

एसटी बसस्थानकातून मोबाईल चोरीस
एसटी बसस्थानकातून मोबाईल चोरीस
Published on : 27 February 2023, 3:39 am
एसटी बसस्थानकातून मोबाईल चोरीस
कणकवली ः भडगाव येथील एकाचा येथील बसस्थानकातून मोबाईल चोरीस गेला. ही चोरी २३ फेब्रुवारीच्या रात्री झाली. याबाबत भडगाव (ता. कुडाळ) येथील धीरज सुरेश सावंत (वय ३३) यांनी आज येथील पोलिसांत फिर्याद दिली. सावंत हे रत्नागिरी येथून कणकवलीत उशीराने आले होते. रात्री गावाकडे जाण्यासाठी वाहनांची सोय नसल्याने बसस्थानकात झोपले. यावेळी त्यांच्या बॅगेतील दोन हजाराचा मोबाईल चोरीस गेला. सकाळी उठल्यानंतर मोबाईल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. बसस्थानकातील सीसीटीव्हीमध्ये मोबाईल चोर कैद झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.