रत्नागिरी पालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी पालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई
रत्नागिरी पालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई

रत्नागिरी पालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांवर कारवाई

sakal_logo
By

पान १ साठी

रत्नागिरी पालिकेच्या २ कर्मचाऱ्यांवर कारवाई
मुख्याधिकारी बाबर; घरपट्टी वसुलीवर संशय, नोटीस बजावत तडकाफडकी बदली
रत्नागिरी, ता. २७ ः संशयास्पद घरपट्टी कर वसुलीवरून पालिकेच्या वसुली विभागातील दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावून त्यांची अन्य विभागात तडकाफडकी बदली केली. कामात कसूर केल्याचा ठपका ठेवून दोन्ही कर्मचाऱ्यांची ही प्रशासकीय बदली केल्याची माहिती मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली.
शहरात सुमारे २ हजार मालमत्ताधारक आहेत. त्यांच्याकडून सुमारे सहा कोटींच्या दरम्यान कर वसुली होते; परंतु यंदा घरपट्टी कर वसुलीवरून मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतले जात आहेत. अनेकांना चुकीच्या पद्धतीने कर आकारणी केली आहे. ज्याच्याकडे भाडेकरू आहे, त्यांच्याकडून चार ते पाच पट कर आकारणी केली आहे. काहीच्या वाढीव घरपट्टी कमी करण्यासाठीही सेटिंग केली गेल्याची उदाहरणे पुढे आली. एकूणच पालिकेच्या घरपट्टी वसुलीवर संशयाचे बोट दाखविले जाऊ लागले. याबाबत काही नागरिक प्रसारमाध्यमांकडे गेल्यानंतर याचा भांडाफोड करण्याचे काम माध्यमांनी केली. याची तत्काळ दखल पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली. त्यांनी मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याशी चर्चा करून वसुली विभागाची तातडीची बैठक लावली. यामध्ये शहरातील मालमत्तांची पंचवार्षिक सर्वेक्षणाचा आढावा घेतला.
वसुली विभागाच्या लिपिकांनी प्रत्येक घर, दुकान व इतर ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन सर्वेक्षण केले. वाढीव बांधकाम करणाऱ्‍यांसह अनधिकृत बांधकाम आणि भाडेकरू ठेवणाऱ्‍या २ हजार मालमत्ताधारकांना नगर पालिका, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ११९ व १२० अन्वये इमल्यावरील कन्सॉलिडेटेड आकारणीची वाढीव घरपट्टी नोटिसा बजावल्या. यापैकी ६५० मालमत्ताधारकांनी ही आकारणी चुकीची असल्याचे तक्रार अर्ज १५ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीपर्यंत केले आहेत. या अपिलांवर सुनावणी होऊन निर्णय घेतला जाणार आहे. नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक आणि त्यांच्या पथकासमोर ही सुनावणी होणार आहे.


कामात कसूर
दरम्यान पालिका प्रशासनाने संशयास्पद कर वसुलीची माहिती घेतली असता काही कर्मचाऱ्यांनी कामात कसूर केल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांची तत्काळ अन्यत्र तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.