भोसले पॉलिटेक्निकमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा

भोसले पॉलिटेक्निकमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा

swt28.jpg
85838
सावंतवाडीः भोसले पॉलिटेक्निक येथे मराठी कॅलिग्राफी व शब्दचित्राची पाहणी करताना विद्यार्थी.

भोसले पॉलिटेक्निकमध्ये
मराठी राजभाषा दिन साजरा
सावंतवाडी, ता. २८ः येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक येथे ‘मराठी राजभाषा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित मराठी कॅलिग्राफी, शब्दचित्र गुंफण स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे रजिस्ट्रार प्रसाद महाले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रा. गजानन भोसले यांच्या हस्ते कविवर्य कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. मराठी दिनाचे औचित्य साधून कॉलेजच्या लायब्ररी विभागातर्फे मराठी कॅलिग्राफी व शब्दचित्र गुंफण स्पर्धा आयोजित केली होती. शब्दचित्र गुंफण स्पर्धेत विद्यार्थी गटातून केदारनाथ गवस, वैष्णवी तळेकर व अर्पिता गावडे यांनी प्रथम तीन क्रमांक प्राप्त केले. मनीष राऊळ, चैताली मेस्त्री यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. मराठी कॅलिग्राफ स्पर्धेत विद्यार्थी गटातून अनुक्रमे अथर्वा परब, सावनी जाधव, अक्षय झोरे यांनी क्रमांक प्राप्त केला. चिन्मय नाईक, भिवा जाधव यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला. शब्दचित्र गुंफण स्पर्धेत कर्मचारी गटामध्ये नितीन सांडये, प्रा. हवाबी शेख आणि प्रा. नेहल सांडये यांनी प्रथम तीन, तर स्वप्नील परब, देवानंद राऊळ यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. संयोजन ग्रंथपाल मानसी कुडतरकर, ग्रंथालय सहाय्यक शरद घारे व जानू पाटील यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com