बाव येथील शिबिरात 117 जणांची चिकित्सा

बाव येथील शिबिरात 117 जणांची चिकित्सा

swt२८३.jpg
८५७७५
बावः आरोग्य तपासणी शिबिरात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वागत करताना स्वामिनी परब व अन्य.

बाव येथील शिबिरात
११७ जणांची चिकित्सा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ः बाव ग्रामपंचायत येथे समर्थ महिला शक्ती प्रतिष्ठान व माविम महिला बचतगट, ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी या सर्वांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा लाभ ११७ रुग्णांनी घेतला.
शिबिराचे उद्घाटन दंत चिकित्सक डॉ. साक्षी तेली यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. प्रणव प्रभू, दीपक राऊत, मिर्नवास परब, आशिष परब, गौरी सामंत, ग्रामपंचाय़त सद्स्य सविता सुतार, गसानिका परब, प्रमोद कदम तसेच बाव ग्रामस्थ दिलीप परब, प्रशांत परब, दीपक राऊत, रामदास परब, प्रकाश राणे, मनोहर टोपले, मंगेश मांजरेकर, नागेश करलकर, तंटामुक्ती अध्यक्ष आदी उपस्थितीत झाले.
शिबिरात ८७ रुग्णांची नेत्र चिकित्सा, ८५ जणांची रक्त तपासणी, ११७ जणांची आरोग्य तपासणी, तर ६८ रुग्णांची दंत चिकित्सा करण्यात आली. यात मोतीबिंदूचे १०, नेत्रदोष ३६, तर दंतदोषाचे ४८ रुग्ण मिळाले. शिबिर यशस्वी होण्यासाठी समर्थ महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष स्वामिनी परब, उपाध्यक्ष पूर्वा परब, सचिव दीपश्री राऊत, खजिनदार अश्विनी आसोलकर, गौरी सामंत, हेमा राणे, सुजाता राणे, मजुंश्री मांजरेकर, संजना मयेकर, मनाली टोपले, अस्मिता मांजरेकर, अनुजा आसोलकर आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com