राऊळ महाराज महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राऊळ महाराज महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात
राऊळ महाराज महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात

राऊळ महाराज महाविद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात

sakal_logo
By

swt282.jpg
85774
कुडाळः मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. झोडगे, प्रा. डॉ. आसोलकर, प्रा. डॉ. लोखंडे, प्रा. डॉ. आवटे, प्रा. वालावलकर आदी.

राऊळ महाराज महाविद्यालयात
मराठी भाषा दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ः येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. झोडगे यांच्या शुभ हस्ते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी मराठी भाषेची गतकाळाची व वर्तमान वाटचाल याबद्दल विद्यार्थ्यांना परिचय करुन दिला.
प्र. प्राचार्य प्राध्यापक डॉ. झोडगे यांनी मराठी ही आपली मातृभाषा आहे. याचा विसर होऊ न देता युवापिढीने तिचे उपयोजन केले पाहिजे, असे सांगितले. यावेळी डॉ. ए. एन. लोखंडे, डॉ. कॅप्टन एस. टी. आवटे, डॉ. व्ही. जी. भास्कर, प्रा. जमदाडे यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी मराठी विभागातर्फे विविध प्रसंगी आयोजित केलेल्या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना मराठी विभागाच्या वतीने पुस्तकभेट देऊन गौरविण्यात आले. उत्तम वाचक म्हणून रसिका म्हापसेकर या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली. विशेष लेखन कौशल्यांची वर्ष व्यवस्थापन शास्त्र  या वर्गातील धनश्री मुंज हिलाही पुस्तकभेट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मानसी भागवत हिच्या मराठी अभिमान गीतगायनाने झाली. स्वागत मराठी विभाग प्रमुख डॉ. आसोलकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संतोष वालावलकर यांनी केले तर चेतना राठोड हीने आभार मानले.