
कुडाळ हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन
swt२८५.jpg
८५७७७
कुडाळः मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र गीत सादर करताना कुडाळ हायस्कूलचे विद्यार्थी.
कुडाळ हायस्कूलमध्ये मराठी भाषा दिन
कुडाळः कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी व्यासपीठावर ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य राजकिशोर हावळ होते. यावेळी मराठी विभाग प्रमुख श्री. साळवी, श्री. कदम, श्री. परीट, श्री. पाटील, श्री. बागवे उपस्थित होते, कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक श्री. पवार यांनी केले. अकरावीच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र गीत आणि मराठी अभिमान गीत सादर केले. दिशा मुंगी ह्या विद्यार्थिनीने मराठी दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. गौरी पाटील हिने कुसुमाग्रजांची ''कणा'' कविता, तर अकरावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी सेजल पवार हिने ''बाप'' कविता सादर केली. श्री. हावळ यांनी वाचनाचे महत्त्व सांगितले. श्री. साळवी यांनी मराठीतून शिक्षण घेऊन यूपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांत यशस्वी होण्याचे आवाहन केले. श्री. परीट यांनी ''नटसम्राट'' नाटकातील स्वगत सादर केले. श्री. कदम यांनी या सोहळ्याचे कौतुक करत शारदीय चांदण्यात न्हावून निघाल्याचा आभास झाल्याचे सांगितले. आभार सेजल वालावलकर यांनी, सूत्रसंचालन विणा गाड हिने केले.
.............
सावंतवाडीत शनिवारी ज्येष्ठ नागरिक सभा
सावंतवाडीः तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा शनिवारी (ता. ४) सकाळी १०.३० वाजता ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा-सावंतवाडी येथे आयोजित केली आहे. सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
.............