आदर्श सुसंकृत व्यक्तीमत्व आमदार शेखर सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदर्श सुसंकृत व्यक्तीमत्व आमदार शेखर सर
आदर्श सुसंकृत व्यक्तीमत्व आमदार शेखर सर

आदर्श सुसंकृत व्यक्तीमत्व आमदार शेखर सर

sakal_logo
By

rat२८१४.txt

बातमी क्र..१४ (टुडे पान ३ साठी)

आमदार शेखर निकम वाढदिवस विशेष---लोगो

फोटो ओळी
-rat२८p२०.jpg-
85794
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करताना आमदार शेखर निकम.
-rat२८p२१.jpg-
85795
शिवजयंतीनिमित्त आयोजित सोहळ्यात सहभागी झालेले आमदार शेखर निकम.
-rat२८p२२.jpg-
85796
युवकांशी संवाद साधताना आमदार शेखर निकम.
-rat२८p२३.jpg-
85810
भूपुष्ठ वाहतूक व जहाज मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करताना आमदार शेखर निकम.
---------

आई-वडिलांच्या संस्कार व शिकवणीतून शेखरसरांचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रगल्भ झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्व. गोविंदराव निकम साहेबांनी सह्याद्री शिक्षणसंस्थेची स्थापना केली. निकमसाहेबांच्या कामाची पद्धत, समाजातील सर्व घटकांना एकत्र करून सर्वांगीण विकास साधण्याचे कसब, मेहनत, गोरगरीब जनतेसाठी काम करण्याची पद्धत, समाजकारण व राजकारण सरांनी वडिलांच्या सहवासात अगदी जवळून पाहिले होते एवढेच नाही तर या सर्वांचे बाळकडू सरांना आपल्या कुटुंबातच मिळाले होते आणि शेखरसरांच्या आदर्श व्यक्तिमत्वाचा पाया त्या वेळेलाच तयार झाला होता.

- मिलिंद गजानन यादव
गोविंदराव निकम विद्यालय, सावर्डे
----

आदर्श सुसंकृत व्यक्तीमत्व आमदार शेखर सर

प्रत्येकाच्या मनात कोणाचा ना कोणाचा आदर्श असतोच. आदर्श समोर ठेवल्याशिवाय कृती घडत नाही. कुणी एखाद्याच्या विचाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो, कुणी बोलण्याचा, कुणी लेखनाचा, कोणी वक्तृत्वाचा, कुणी गायनाचा तर कोणी राहणीमानाचा. सुंदर सुवाच्य अक्षरातील पत्र आपण जपून ठेवतो, कलात्मकतेने घर सजवतो, एखादा पदार्थही सुंदर पद्धतीने सजवतो. कोणत्या ना कोणत्या आदर्श आचार विचार कृतींना धरून वागायचे ठरवले तर जीवनसाफल्य मिळवता येते. असेच एक आदर्श आचार, आदर्श विचार सर्वसमावेशक नेतृत्व, जिल्ह्याच्या राजकारण्यातील सुसंस्कृत चेहरा. या चेहऱ्याने राजकारणात वैचारिकता, शालिनता, संयम, नम्रता, प्रगल्भता, निष्ठा व संस्कार रूजवण्याचे काम केले. लोकप्रतिनिधी म्हणून अगदी अल्पावधीतच आपल्या कर्तृत्वाची छाप जनसामान्यांवर पाडली ते आदर्श व्यक्तिमत्त्व आपणा सर्वांचे लाडके चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम. सरांचा आज वाढदिवस...
गोरगरीब जनतेचा कैवारी, समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून काम करणारे, दूरदृष्टी, सुसंस्कृत, नम्र, अभ्यासू, एखाद्या प्रश्नाचा सखोल अभ्यास, भविष्याचा अचूक वेध, आयुष्यातील प्रत्येक संकटाचा जिद्दीने सामना करणे, अनेक आव्हानांना बुद्धिमत्तेची आणि आत्मविश्वासाची जोड देणे, जिद्द, मेहनत, चिकाटी, आत्मविश्वास या गुणांचा समुच्चय सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर यांच्या कर्तृत्वातून आणि नेतृत्वातून पाहावयास मिळतो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्यात सहभाग, विविध साहित्य, वाङ्मय क्षेत्रात लिलया संचार. कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण, कृषी अशा विविध क्षेत्रात शेखर सर अतिशय आनंदाने काम करत आहेत.
गोविंदराव निकम साहेबांच्या अकाली निधनाने सरांवर सह्याद्री शिक्षणसंस्थेचा डोलारा सांभाळण्याची अत्यंत महत्वपूर्ण जबाबदारी आली; परंतु जिद्द, चिकाटी, दूरदृष्टी इत्यादी गुणांनी ठासून भरलेले सरांचे व्यक्तिमत्व.. सरांनी ही जबाबदारी अत्यंत आत्मविश्वासाने खांद्यावर घेतली. पितृनिधनाचे दुःख बाजूला सारून होय! मी हा रथ पुढे नेईन, असे स्वर्गस्थ साहेबांना आश्वासित करून शेखर सर कामाला लागले आणि आज सह्याद्री शिक्षणसंस्थेला शेखर सरांनी अतिशय उत्तुंग स्थानावर नेऊन ठेवले आहे. सह्याद्री शिक्षणसंस्थेला प्रचंड वैभव प्राप्त करून दिले आहे. राजकारणाची आवड असलेल्या सरांमध्ये एक आदर्श राजकारणी आपल्याला पाहावयास मिळतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेबांचा शेखर सरांवर प्रचंड विश्वास. सुरवातीला सरांना रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.
२०१४ मध्ये चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमदारकीचे तिकीट दिले. सरांनी अत्यंत प्रामाणिकपणे कामाला सुरवात केली. जनसामान्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यांना आधार देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले; परंतु काही थोडक्यात मतांच्या अंतराने सरांचा पराभव झाला. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याचा पराभव जिव्हारी लागला. सरांना आपल्या पराभवाचे शल्य होतेच; परंतु निवडणुकीत पराभव होऊनही सर डगमगले नाहीत, निराश झाले नाहीत. त्या वेळी सुद्धा नेहमीप्रमाणे सरांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते. पराभवाने खचून जाऊ नका, जोमाने पुन्हा कामाला लागा हे जणू काही सर आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या चेहऱ्यावरून सांगत असावेत. आपला झालेला पराभव हाच आपला विजय. आपल्याला आलेले अपयश हीच आपली संधी मानून सर अगदी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले आणि सरांच्या व्हॉट्सअॅपवर स्टेटस दिसू लागले. ‘We will try in next election’ आणि याच वाक्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढील पाच वर्षे लढण्याची प्रेरणा दिली, बळ दिले आणि सरांच्या आगामी निवडणुकीत विजयाची मुर्हूर्तमेढ या वेळेलाच रोवली गेली. अगदी पायाला भिंगरी लागल्यागत संपूर्ण विधानसभा मतदार संघ सरांनी पिंजून काढायला सुरवात केली. आमदार होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मतदार संघात लोकसंपर्क वाढवण्यास सुरवात केली. गावागावातील, वाडीवाडीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटन मजबूत केले. मतदार संघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याचा सपाटाच लावला. जनतेची कामे स्वखर्चाने केली.
--
‘जलदूत’ म्हणून ओळख

''पाणी म्हणजे जीवन''. पाणी आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात अनेक गावात पाण्याची समस्या होती आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी सरांनी स्वखर्चातून अनेक ठिकाणी विंधन विहिरी पाडल्या आणि जनतेचा पाणीप्रश्न कायमचा सोडवला. यामुळे सरांचे ''जलदूत ''अशी ओळख निर्माण झाली. आयुष्यातील चांगल्या कामाची पोचपावती नक्कीच मिळते. अगदी तसेच झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सर प्रचंड मतांच्या फरकाने विजयी झाले आणि सामान्य जनतेला मिळाला तो आपल्या हक्काचा माणूस... आपल्या हक्काचा आमदार...
----
कुटुंबातीलच सदस्य

मला आलेले कोणतेही अपयश हे माझे स्वतःचे आणि मला आलेले यश हे माझ्या सर्वसामान्य जनतेचे, हे माझ्या कार्यकर्त्यांचे असा सरांचा विचार. सरांना कोणीही भेटावयास आले तर त्यांच्याशी आपुलकीने बोलायची सरांची पद्धत, एखाद्याची समस्या, अडचण किंवा कोणते काम असो ते पूर्ण करण्यासाठी सर जी आत्मियता दाखवतात ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर कोणत्याही सन्मानाची अपेक्षा न करता सर इतरांबरोबर समरस होतात. सरांची लोकांशी जवळीक वाढत गेली ती त्यांच्या अशा या प्रेमळ, निःस्वार्थी वागणुकीमुळेच. सरांना एखादी व्यक्ती सुरवातीला भेटली तर तो सरांचा चाहता बनणारच. आपल्या कार्यकर्त्यांची सर अतिशय प्रेमाने चौकशी करतात एवढेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचीही आपुलकीने चौकशी करतात. सरांच्या या स्वभावामुळे कार्यकर्त्यांनासुद्धा सर आपल्या कुटुंबातीलच वाटतात. सह्याद्री शिक्षणसंस्था हे माझे कुटुंब आहे आणि या कुटुंबातील प्रत्येक घटक माझा आहे, असं मानून प्रत्येकाच्या सुखदुःखात सर धावून जातात. आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडवून, त्यांची विकासकामे करून आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आनंद सर मिळवत असतात. सर्वसामान्य जनतेच्या कोणत्याही प्रसंगात ठामपणे पाठीशी उभे राहतात. जनतेचा आधारस्तंभ बनतात. लोकप्रतिनिधी म्हणून सरांचे एक वेगळेपणच आहे. त्यांच्याकडे आलेला कुठलाही माणूस मग तो समर्थक असो वा विरोधक त्याची कोणतीही अडचण आनंदाने सोडवणार, असे सर आवर्जून सांगतात व तसे करतात. त्यांच्या या अतिशय वेगळ्या आणि आदर्श स्वभावामुळे विरोधी पक्षातील मंडळीसुद्धा सरांचा प्रचंड आदर करतात. विरोधकांनाही सर आपलेसे वाटतात.
--

उत्तम क्रिकेटपटू

राजकारणात चौफेर फटकेबाजी करणाऱ्या सरांना क्रीडाक्षेत्राची सुद्धा प्रचंड आवड आहे. ते स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू आहेत. खेळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक माणसे जोडली आहेत. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर त्यांचे अतिशय निकटचे संबंध आहेत. विविध क्रीडास्पर्धांचे आयोजन करून उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम सर अगदी आनंदाने करतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाला महत्व दिले पाहिजे, असे सर आवर्जून सांगतात. कोकणच्या मातीत अनेक खेळाडू घडावेत, ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत, अशी सरांची अतिशय प्रामाणिक इच्छा असते.
--
मतदारसंघाचा कायापाटलट हे ध्येय

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघामध्ये सुरवातीपासूनच सरांनी कोट्यवधीची विकासकामे केली आहेत. जनतेचा विकास करण्याचा वसा घेतलेले सर आजही प्रचंड विकासकामे मतदारसंघात आणत आहेत. रस्ते, बंधारे, पूल, सभागृह, पिकअप् शेड्स, पाखाड्या, मोऱ्या, गणेश विसर्जन घाट, मंदिर उभारणी, कंपाउंड वॉल, सभागृह अशी अनेक विकासकामे सरांनी केलेली आहेत. आपल्या जनतेसाठी विविध विकासकामे करणे, आपल्या मतदारसंघाचा कायापालट करणे हेच ध्येय उराशी बाळगून आपले कार्य सरांनी अविरतपणे सुरू ठेवले आहे. चिपळूणचा महाप्रलय, कोरोना महामारी, चिपळूणमधील नद्यांचा गाळ उपसा, राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम यासारख्या अतिशय मोठ्या समस्यांवर शेखर सरांनी घेतलेली भूमिका म्हणजे त्यांची राजकारणातील परिपक्वता लक्षात येते. एखाद्या प्रश्नाचा सखोल अभ्यास करून, दूरदृष्टी समोर ठेवून विधानसभेत तो मांडण्याची सरांची खासियत तर वेगळीच आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी अहोरात्र काम करणारे, मतदारसंघात विकासाची गंगा आणणारे, प्रत्येकाशी आदराने, विनयाने, प्रेमाने, आपुलकीने बोलणारे.. पाठीवर प्रेमाने हात फिरवून बळ देणारे.. शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे, प्रखर बुद्धिमत्तेने व कार्यकुशलतेने विकासकामे करून मतदार संघाचा कायापालट करणारे, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्वाचा सुरेख संगम, तरुणांचे आशास्थान, तरुणांचे आदर्श व्यक्तिमत्व आमदार शेखरजी निकम सर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. सरांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...
...