चिपळूण-पुरवणी लेख

चिपळूण-पुरवणी लेख

rat२८१३.txt

बातमी क्र. .१३

(टुडे पान ४ साठी)
(टीप- हा लेख छोटा आहे. त्यामुळे त्याच्यात फोटो जास्त वापरावेत, किंवा एका बाजूला एकाखाली एक फोटो फिचर करावे.)

आमदार शेखर निकम वाढदविस विशेष---डोके

फोटो ओळी
-rat२८p३०.jpg-
८५८१६
मुंबई ः महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष मा. राहुल नार्वेकर यांची विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आमदार शेखर निकम, आमदार अनिल परब, आमदार अशोकबापू पवार आदी उपस्थित होते.
-rat२८p३१.jpg-
८५८१७
विरोधी पक्षात असूनही आमदार शेखर निकम यांचे सर्व राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्याशी चर्चा करताना आमदार शेखर निकम.
-rat२८p३२.jpg-
८५८१८
सर्वसामान्य नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या आमदार शेखर निकम जाणून घेतात.
-rat२८p३३.jpg-
८५८१९
अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने विधानभवनाबाहेर केलेल्या आंदोलनात आमदार शेखर निकम सहभागी झाले होते.
-rat२८p३४.jpg-
८५८२०
चिपळुणातील महापुरावेळी नागरिकांना मदत करण्यात आमदार शेखर निकम आघाडीवर होते.
-rat२८p३५.jpg-
८५८२१
राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आमदार शेखर निकम, सौ. पूजाताई निकम, अनिरुद्ध निकम.
--

आपला माणूस.. आमदार शेखर सर

प्रगतीपथावरचा समाज नेहमीच गावागावाचा उत्कर्ष करत असतो. त्याचे एकमेव कारण असते ते म्हणजे त्या समाजात राहणारी बहुआयामी व्यक्तिमत्व तिथे राहत असतात. अगदी त्याचप्रमाणे ''दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती'' असे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे शेखर सर. बुधवारी (ता. १ मार्च) शेखर सरांचा वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा.
----
कणसामध्ये काही कणसे दाणेदार असतात. माणसामध्येही काही माणसे बाणेदार असतात. स्मित हास्य, तेजस्वी आणि मधाळ वाणी, शांत संयमी वर्तन, मनमिळाऊ स्वभाव समोरच्याला आपुलकीची भावना आपोआपच वृद्धिंगत करत आपला ठसा उमटवणे ही शेखरसरांच्या व्यक्तिमत्वाची छाप त्यांनी केलेल्या कर्तृत्वाला आकाश ठेंगणे करून सोडते. प्रश्नाचे उत्तर प्रश्न असू शकत नाही. मोठेपणा दाखवल्याने मोठेपण मिळत नाही. त्यासाठी खरोखर मोठे व्हावे लागते. मनाने, त्यागाने आणि कार्याने. ज्यांच्यासोबत सुंदर विचार असतात ते जगात कधीही एकटे नसतात. तळागाळातील माणूस त्याचा विकास झाला पाहिजे यावर असणारा कटाक्ष आणि विशाल दृष्टिकोन, सर्वांनाच विश्वासात घेऊन काम करण्यांची त्याची पद्धत, सकारात्मकता यामुळे अनेक माणसं त्यांची कामे घेऊन शेखरसरांकडे येताना दिसतात.
त्या कामामध्ये गावागावातील ग्रामपंचायत विकास, नगरपंचायती विकास, आरोग्यसेवेची उभारणी, महापूर, कोविड कालावधीतील हतबल झालेली माणसं, त्यांना उभारी देण्याचे काम, शेतकरी बांधवांना विविध माध्यमांतून नवीन तंत्र, सोयीसुविधांचा लाभ, राहता राहिला प्रश्न तो रोजगार निर्मितीचा, तो तर क्रीडा, संस्कृती, पर्यटन, लोकाश्रयांच्या लोककलेचे संवर्धन या माध्यमांतून चौफेर लक्ष घालून लोकप्रतिनिधी म्हणून अनेक विकासकामे मार्गी लावलेली दिसून येतात.
किनारपट्टीपासून डोंगराळ भागापर्यंत वास्तव्य करणारे माणसाचे लोण विविधांगी प्रश्न घेऊन सरांच्या भेटीला येतात. या सर्वाची नोंद घेत सहजगत्या त्याचे प्रश्न कसे सोडवता येतील यावर विचारमिमांसा शासनदरबारापर्यंत ठेवण्याचे शेखरसरांचे आचरण असते.
''चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं.
उंच भरारी मारणाऱ्याला आकाशाचे ओझं नसतं''
समाजातील प्रत्येक घटक सक्षम झाल्याखेरीज समाज संतुष्ट होणार नाही. अगदी तसंच शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, कला, राजकारण, समाजकारण या प्रत्येक क्षेत्रावर स्वतःच्या प्रकाशकिरणांनी समाज कसा तेजोमय बनेल याची ध्येयपूर्तता शेखरसरांच्या आचरणात नेहमीच दिसते. प्रत्येक माणसाला सोबत घेऊन समाजसेवेचा अखंड वारसा पुढे नेण्याचे तुमचे ध्येय शेखरसर आम्हा सगळ्यांना नेहमीच आदर्शवत वाटते.

- रश्मी रामचंद्र मोरे, शिक्षिका
प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी, सती (ता. चिपळूण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com