चेंदवणला विविध धार्मिक कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चेंदवणला विविध 
धार्मिक कार्यक्रम
चेंदवणला विविध धार्मिक कार्यक्रम

चेंदवणला विविध धार्मिक कार्यक्रम

sakal_logo
By

चेंदवणला विविध
धार्मिक कार्यक्रम
कुडाळ ः चेंदवण (ता.कुडाळ) येथील देवी माऊली मंदिरचा अवतार प्राप्ती दिन (वाढदिवस) सोहळा ३ ते ४ मार्च या कालावधीत आयोजित केला आहे. यानिमित मंदिरात श्रीसुक्त विधान याग होणार आहे. शुक्रवारी ३ मार्चला सकाळी ७ वाजता षोड्शोपचार पूजा, ८ ते ९.३० वाजता धार्मिक विधी, ११ वाजता श्रीसुक्त, जप प्रारंभ-ग्रहयज्ञ, दुपारी १ वाजता नैवेद्य व आरती, मंत्रपुष्प, सायंकाळी ६ वाजता देव पाताळेश्वर देवाची पालखी व देवी माऊली भेट सोहळा, ७ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री ८ वाजता पालखी सोहळा, ९ वाजता चिमणी पाखरं डान्स अ‍ॅकॅडमी (कुडाळ) यांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
तळकटला आज
‘अर्धाशिरा’ नाटक
दोडामार्ग ः तळकट येथील श्रीदेवी माऊली देवीचा वाढदिवस सोहळा उद्या (ता. १) मार्चला होत आहे. या निमित्ताने सकाळी आठला श्री देवी माऊली व परिवार देवतांची पूजा, सकाळी नऊला श्री देवी माऊली अभिषेक, सकाळी साडेदहाला श्रींची महापूजा, दुपारी साडेबाराला आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी चार ते सहा महिलांच्या फुगड्या, सायंकाळी सात ते साडेनऊ ग्रामस्थांची भजने, रात्री साडेदहाला श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘अर्धाशिरा’ होणार आहे.
---------------
अरविंद करलकर
उपतालुकाप्रमुख
कुडाळ ः शिवसेना शिंदे गटाच्या कुडाळ उपतालुकाप्रमुखपदी बाव येथील अरविंद करलकर यांची निवड करण्यात आली. कणकवली येथील शिवसेना शाखेत नेते व ब्रिगेडीयर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हाप्रमुख आघाडी वर्षा कुडाळकर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश तुळसकर यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत करलकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, कुडाळ-मालवण विधानसभाप्रमुख बबन शिंदे, चैतन्य कुडाळकर, अनघा रांगणेकर, आशू अग्रवाल तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षात येण्यास अनेकजण इच्छुक असल्याचे करलकर यांनी सांगितले.