अर्चना फाउंडेशनतर्फे नुकसानग्रस्तांना मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्चना फाउंडेशनतर्फे नुकसानग्रस्तांना मदत
अर्चना फाउंडेशनतर्फे नुकसानग्रस्तांना मदत

अर्चना फाउंडेशनतर्फे नुकसानग्रस्तांना मदत

sakal_logo
By

८५८५८
अर्चना फाउंडेशनतर्फे नुकसानग्रस्तांना मदत
वेंगुर्ले ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा अर्चना घारे फाउंडेशनच्या अध्यक्षा अर्चना घारे-परब आणि माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी शिरोडा येथे लागलेल्या भीषण आगीत नुकसान झालेल्या दुकानांची पाहणी करून व्यापाऱ्यांची भेट घेतली. त्यांनी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केली. आगीत येथील डॉ. साळगावकर यांच्या दवाखान्यासह पाच दुकानांचे नुकसान झाले आहे. याबाबत घारे व प्रवीण भोसले यांनी या व्यापाऱ्यांना भेट देऊन डॉ. साळगावकर व अजित आरावंदेकर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माजी आमदार शंकर कांबळी यांच्या कार्यालयात रोख २५ हजार रुपये व्यापारी संघाचे अध्यक्ष राजन शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द केले. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार कांबळी, ‘राष्ट्रवादी’चे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब, उपसरपंच चंदन हाडकी, सदस्य मयुरेश शिरोडकर, धाकोरेचे माजी सरपंच अजित नातू आदी उपस्थित होते.
---
८५८५६

नंदकुमार घाटेंचा देवगडमध्ये सत्कार
देवगड ः जामसंडे शहर व्यापारी संघटना आणि महिला व्यापारी संघटनेतर्फे जामसंडे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. याचा विविध मान्यवरांनी लाभ घेतला. उद्योगपती नंदकुमार घाटे यांनी कार्यक्रमस्थळी भेट दिली. व्यापारी संघटनेतर्फे राजू पाटील यांनी त्यांचा सन्मान केला. व्यापारी प्रवीण जोग, शेखर तेली, जयेश गोरे, उमेश कुळकर्णी, संजय तारकर, शरद लाड, श्री. काटदरे यांच्यासह शरद शिंदे, जयराम कदम आदी उपस्थित होते. दुपारी दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी गर्दी झाली होती. यात महिलांचीही संख्या अधिक होती. तसेच, स्थानिक भजने झाली. रात्री साडेनऊला माझी मायबोली राधानगरी प्रस्तुत महाराष्ट्राची परंपरा जागृत ठेवणारा संगीत नृत्याविष्कार ‘गाथा महाराष्ट्राची’ कार्यक्रम होणार आहे. त्याची तयारी सुरू होती.