किल्ले विजयदुर्गवर उलगडले ‘शिवराजभूषण’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले विजयदुर्गवर उलगडले ‘शिवराजभूषण’
किल्ले विजयदुर्गवर उलगडले ‘शिवराजभूषण’

किल्ले विजयदुर्गवर उलगडले ‘शिवराजभूषण’

sakal_logo
By

85854
विजयदुर्ग ः येथील किल्ले विजयदुर्गवर कवी भूषण साटम यांच्याकडून सादरीकरण करण्यात आले.


किल्ले विजयदुर्गवर उलगडले ‘शिवराजभूषण’

भूषण साटम यांचे सादरीकरण; ग्रामपंचायत, प्रेरणोत्सव समितीचा उपक्रम

देवगड, ता. २८ ः शिवकालिन कवी ब्रिजभूषण यांच्या सिद्धहस्तातून छत्रपती शिवरायांवर आधारीत ‘शिवराजभूषण’ या काव्यसंग्रहातील काही छंद आणि त्यांचे अर्थ किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे माजी अध्यक्ष तथा कवी भूषण साटम (मालवण) यांनी उलगडले. ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेला तालुक्यातील किल्ले विजयदुर्गही शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या अशा कार्यक्रमामुळे जणू काहीसा भारावला.
विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या बोधचिन्हाचे अनावरण आणि मराठी भाषादिन याचे औचित्य साधून ग्रामपंचायत विजयदुर्ग आणि किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री. साटम यांनी सादरीकरण केले. अ‍ॅड एजन्सीज अ‍ॅन्ड मिडिया असोसिएशन ऑफ साऊथ महाराष्ट्र (आसमा) च्या पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत किल्ले विजयदुर्गच्या सदरेत हा कार्यक्रम सादर करण्यात आला. आरमारी किल्ल्यांच्या शृंखलेंमधील अतिमहत्वाच्या आणि असंख्य तोफगोळ्यांचे वार झेललेल्या किल्ले विजयदुर्गच्या साक्षीने पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थित सर्वच भारावून गेले. कवी भूषण यांनी छत्रपती शिवरायांवर लिहिलेले ५८६ छंद आणि १०५ अलंकार यांनी शब्दबद्ध केलेला शिवराजभूषण काव्यसंग्रह म्हणजे शिवाजी महाराजांची बुद्धीमत्ता, चातुर्य, औदार्य, युद्धनिती, एकोपा या व अशा अनेक स्वभाव वैशिष्ट्यांचा एक खजिनाच जणू हा काव्यसंग्रह ब्रिजभाषेत असल्याचे मानले जाते. त्यातील छंद मुखोद्गत सादर करणे आणि त्याचे सोप्या भाषेत विवेचन करणे यातून भूषण साटम यांनी उपस्थितांची मने जिंकली. शिवराजभूषण काव्यसंग्रहातील कांही मोजक्या छंद आणि अलंकारांचे सादरीकरण सुमारे एक तासांच्या आयोजित कार्यक्रमात करण्यात आले होते. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने कविता तळेकर यांनी ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी’ हे गायन सादर केले. विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच रियाझ काझी, सदस्य सिद्धेश डोंगरे, सदस्य शुभा कदम, वैशाली बांदकर- कीर, प्रतिक्षा मिठबांवकर, माजी सरपंच प्रसाद देवधर, बाळा कदम, माजी उपसरपंच प्रदीप साखरकर, महेश बिडये, शरद डोंगरे, यशपाल जैतापकर इत्यादींसह आसमाचे अध्यक्ष सुनील बासरानी, सचिव संजय चिपळूणकर, खजिनदार राजाराम शिंदे आदी उपस्थित होते. राजीव परुळेकर यांनी स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य पूर्वा लोंबर यांनी आभार मानले.
............
कोट
85855
किल्ले विजयदुर्गवर कवी भूषण साटम (मालवण) यांनी केलेले सादरीकरण अफलातून होते. यातून शिवकालीन इतिहासाची पुन्हा नव्याने उजळणी झाल्याचा भास झाला. यामुळे अ‍ॅड एजन्सीज अ‍ॅन्ड मिडिया असोसिएशन ऑफ साऊथ महाराष्ट्र (आसमा) च्या पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्य भारावण्याबरोबरच स्थानिकांना असा कार्यक्रम ऐकण्याची संधी उपलब्ध झाली.
- राजीव परूळेकर, दुर्ग अभ्यासक, कोल्हापूर