
इन्सुलीत संत रोहिदास, शिवरायांना वंदन
swt2820.jpg
85864
इन्सुलीः संत रोहिदास जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन करताना गुरुनाथ पेडणेकर. यावेळी गणेश म्हापणकर, महेश काळसेकर. (छायाचित्र : भूषण आरोसकर)
इन्सुलीत संत रोहिदास, शिवरायांना वंदन
जयंती सोहळा उत्साहातः गावठाण मित्रमंडळातर्फे विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
इन्सुली, ता. २८ः संत रोहिदास मित्रमंडळ इन्सुली-गावठाण यांच्यावतीने रविवारी (ता. २६) संत शिरोमणी रोहिदास जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांच्या गावठाणवाडी येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संत रोहिदास व आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी इन्सुलकर, सांगेलकर आणि काळसेकर या इन्सुली येथील चर्मकार मुलींनी सुस्वरात ईवस्तवन सादर केले. मंडळाचे अध्यक्ष महेश काळसेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहकार सेवा सोसायटी इन्सुलीचे चेअरमन गुरुनाथ पेडणेकर, पोलिस पाटील जागृती गावडे, उपसरपंच कृष्णा सावंत आदी उपस्थित होते.
सावंतवाडी चर्मकार समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष गणेश म्हापणकर यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली. संत रोहिदास यांच्या चरित्रावर नरेश कारिवडेकर, संजय बांबुळकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशांत बादेलकर, बाळा शेर्लेकर यांचा ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर गणेश म्हापणकर, सदानंद चव्हाण, दीपक इन्सुलकर, दिलीप इन्सुलकर व तेजस्विता इन्सुलकर (भाई कलिंगण नाट्यमंडळ प्रमुख) यांचाही सत्कार याप्रसंगी कारण्यात आला. संजय बांबुळकर यांनी शैक्षणिक प्रदर्शनात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात गणेश म्हापणकर, गुंडू चव्हाण, गुरुनाथ पेडणेकर, जागृती गावडे, कृष्णा सावंत आदींनी मार्गदर्शनपर भाषण केले. या कार्यक्रमास जगदीश चव्हाण, सदानंद चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप इन्सुलकर यांनी मानले. रात्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरुर यांचा ''त्रिसंगम स्वरुपिनी'' हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.