
माणगाव वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन
85866
माणगाव ः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्था उपाध्यक्ष स्नेहल फणसळकर. शेजारी संचालक विजय पालकर, दादा कोरगावकर, सदाशिव पाटील आदी.
माणगाव वाचनालयात
मराठी भाषा गौरव दिन
माणगाव ः श्री वासुदेवानंद सरस्वती वाचनालयात वि. दा. सावरकर यांच्यावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करुन मराठी भाषा गौरवदिन साजरा करण्यात आला. पहिली ते चौथी गटात सावरकरांचे बालपण याविषयावर प्रथम क्रमांक हर्षाली गावडे, द्वितीय भक्ती गायचोर, तृतिय ओम नार्वेकर व उत्तेजनार्थ आराध्या परब. पाचवी ते सातवी गटात सावरकरांचे स्वातंत्र्य विषयक कार्य या विषयावर प्रथम क्रमांक कोमल परब, द्वितीय अनुष्का काणेकर, तृतिय वेदांती लाड व उत्तेजनार्थ श्रावणी दळवी. आठवी ते दहावी गटात सावरकरांचे चरित्र या विषयावर प्रथम क्रमांक तन्वी काणेकर, द्वितीय दिक्षा धुरी, तृतिय सानिका धुमक व उत्तेजनार्थ प्राची सकपाळ यांनी यश संपादन केले. या उपक्रमात एकूण १० शाळा व ४२ विद्यार्थी सहभागी झाले. स्पर्धेचे परीक्षण विजय पालकर व स्नेहल फणसळकर यांनी केले. यावेळी संचालक दादा कोरगावकर, सदाशिव पाटील, स्नेहा माणगावकर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. ग्रंथपाल व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. संस्था उपाध्यक्षा स्नेहल फणसळकर यांनी आभार मानले.
--
८५८५७
सिंधुदुर्गनगरीत ग्रंथ प्रदर्शन
सिंधुदुर्गनगरी ः मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अविशकुमार सोनोने, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे, संदीप शिंदे, प्रतिभा ताटे, किशोर कांबळे आदी उपस्थित होते. मराठी भाषा व ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी भाषा साहित्यिकांच्या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा ग्रंथालय येथे केले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी उद्यापर्यंत (ता. १) खुले राहणार आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांकडून शाळा वाचनालयात कथाकथन, मराठी गाण्यांचे कार्यक्रम झाले. मराठी भाषेचे विविध प्रकारचे फलक लावून प्रसिध्दी करण्यात आली. जिल्ह्यामध्ये मराठी गैरव दिनानिमित्त विविध प्रकारच्या मराठी भाषेच्या स्पर्धा, पुस्तके व कोश ग्रंथालयामध्ये वाढविण्यासाठी व्याख्याने आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
-----
85865
देवगड ः येथील आगारातील निवृत्त कर्मचाऱ्यांचा आगार व्यवस्थापक नीलेश लाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सावंत, वळंजू यांचा देवगडमध्ये सत्कार
देवगड ः येथील आगारातील चालक विजय सावंत (रा. नाटळ, ता. कणकवली) आणि वाहक रवींद्र वळंजू (रा. वळिवंडे, ता. देवगड) नुकतेच निवृत्त झाले. याबद्दल आगाराच्यावतीने शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. चालक सावंत यांनी येथील आगारात १९९६ पासून सेवा सुरू केली. एकाच आगारात त्यांनी सुमारे २७ वर्षे सेवा केली. तर वाहक वळंजू यांची येथील आगारात १९९७ पासून सेवा सुरू झाली. त्यांनीही एकाच आगारात सुमारे २६ वर्षे सेवा केली. आज दोघेही सेवानिवृत्त झाले. याबद्दल त्यांचा निरोप समारंभाच्या औचित्याने सन्मान झाला. यावेळी आगार व्यवस्थापक नीलेश लाड, सहायक वाहतूक निरीक्षक लवू सरवदे यांच्यासह अन्य एसटी कर्मचारी उपस्थित होते.
--
समन्वय समितीची शनिवारी सभा
बांदा ः बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती, सावंतवाडीची विशेष सभा शनिवारी (ता. ४) दुपारी ३.३० वाजता समाजमंदिर, सावंतवाडी येथे आयोजित केली आहे. सभेपुढील विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे नियोजन करणे, अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा विनिमय करण्यात येणार आहे. सभेस सर्व समाज बांधवांसह फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या सर्व समाजातील बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष सुनिल जाधव, सचिव सुरेश जाधव यांनी केले आहे.