चिपळूण ः 25 लाखापर्यंतच्या सर्व कर्जाला 24 तासात मंजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  25  लाखापर्यंतच्या सर्व कर्जाला 24 तासात मंजुरी
चिपळूण ः 25 लाखापर्यंतच्या सर्व कर्जाला 24 तासात मंजुरी

चिपळूण ः 25 लाखापर्यंतच्या सर्व कर्जाला 24 तासात मंजुरी

sakal_logo
By

फोटो - ratchl२८७.jpg ः KOP२३L८५७८३ चिपळूण ः स्थलांतरित शाखेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष निहार गुढेकर व पदाधिकारी.

पंचवीस लाखापर्यंतच्या
सर्व कर्जाला २४ तासात मंजुरी
अध्यक्ष निहार गुढेकर, अर्बन बँकेच्या लोटे शाखेचा स्थलांतर
चिपळूण, ता. २८ ः दी चिपळूण अर्बन को-ऑप बँक लि. चिपळूणचे लोटे शाखेच्या स्थलांतर सोहोळ्याचे उद्घाटन सोमवारी (ता. २७) लोटेचे सरपंच चंद्रकांत चाळके व घाणेखूंटचे सरपंच राजूशेठ ठसाळे यांच्या हस्ते पार पडले. छोट्या कर्जदारांना जास्तीत जास्त कर्जपुरवठा होण्यासाठी २५ लाखापर्यंतच्या कर्जपुरवठ्याला २४ तासात मंजुरी देण्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष निहार गुढेकर यांनी केली.
चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या स्थापनेला ८९ वर्ष पूर्ण झाली असून, कार्यक्षेत्र महाराष्ट्र राज्य आहे. बँकेचे मुख्यालय व २१ शाखा आपल्या ११ एटीएम सेंटर्सद्वारे महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी, रायगड, पुणे, सिंधुदुर्ग या ४ जिल्ह्यात ग्राहकांना सेवा सुविधा देत आहेत. नुकताच बँकेला अविज् पब्लिकेशन कोल्हापूर यांच्याकडून बॅंको ब्ल्यू रिबन- २०२२ चा बेस्ट टर्न अराऊंड पुरस्कार मिळाला आहे. नजीकच्या काळात बँक आयएमपीएस, युपीआयच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा चालू करणार आहे. लोटेच्या शाखा स्थलांतराच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळाल्यानंतर बँकेची शाखा सर्व सोयींनीयुक्त अशा जागेत स्थलांतरित करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष गुढेकर म्हणाले, बँकेकडून सुलभ अर्थपुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. गृहकर्ज, स्थावर तारणी कर्ज, वाहनकर्ज (वैयक्तिक व व्यावसायिक), कॅशक्रेडिट कर्ज, MSME व्यावसायिक कर्जाचे वाटप केले जाईल. त्यामध्ये ग्राहकांना सिबिल धोरणानुसार प्रचलित व्याजदरापेक्षा १ टक्के व्याजदर सवलत व ३१ मार्च २०२३ पर्यंतचे मंजूर व वितरित होणाऱ्या वरील कर्जप्रस्तावास ५० टक्के प्रोसेसिंग फीमध्ये भरघोस सवलत दिली जाईल.
जास्तीत जास्त स्थानिक व्यापारी, व्यावसायिक, ग्राहकांनी संधीचा लाभ घ्यावा. या वेळी उपाध्यक्ष नीलेश भुरण, संचालक संजय रेडीज, राधिका पाथरे, मोहन मिरगल, रहिमान दलवाई, प्रशांत शिरगांवकर, समीर जानवलकर, राजेश केळसकर, मिलिंद कापडी, सतीश खेडेकर, सुचयअण्णा रेडीज, बँकेचे सीईओ संतोष देसाई, चिफ ऑफिसर संतोष सुर्वे, शाखाधिकारी श्रीराम देवळेकर व कर्मचारी बँकेचे सभासद, खातेदार, ग्राहक, हितचिंतक उपस्थित होते.