कुडाळात युवा महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळात युवा महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

swt२८२३.jpg
85913
कुडाळः धीरज परब मित्रमंडळ आयोजित युवा महोत्सव येथे दिमाखात पार पडला. (छायाचित्रः अजय सावंत)

कुडाळात युवा महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद
१६ महाविद्यालयांचा सहभागः धीरज परब मित्रमंडळाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ः येथील धीरज परब मित्रमंडळातर्फे आयोजित युवा महोत्सव रविवारी (ता. २६) येथे दिमाखात पार पडला. गायन, नृत्य, स्कीटने या महोत्सवात उत्तरोत्तर रंगत आणली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलने करण्यात आली. याप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुहास सावंत, उद्योजक व्यावसायिक बापू नाईक, पंजाब नॅशनल बँकचे मॅनेजर निमिष म्हाडेश्वर, हेमंत जाधव, डॉ. नालंदा काजरेकर, सुशांत परब, सचिन गुंड, गौरव मोडक, प्रथमेश धुरी, योगेश राऊळ, अभिजीत गोवेकर, चेतन राऊळ, बाबाजी भोई, वेदांत कुडतरकर, जगन्नाथ गावडे, सुबोध परब आदी उपस्थित होते. युवा महोत्सवांतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील एकूण १३, तर रत्नागिरी जिल्ह्यातील दोन अशा एकूण १५ महाविद्यालयांनी सहभाग घेतला. दिवसभरात विविध ७० स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असाः गायन स्पर्धा-संकेत पाटकर (नर्सिंग कॉलेज, अणाव), स्वरांगी करंदीकर (हॉर्टिकल्चर कॉलेज, मुळदे), गौरेश घावनाळकर (पॉलिटेक्निक मालवण). नृत्य स्पर्धा-समर्थ गवंडी (शिरोडा बीएमएस कॉलेज, शिरोडा), श्वेतांबरी सावंत (पंचम खेमराज सावंतवाडी), ऋत्विक निकम (आपासाहेब मराठे कॉलेज, राजापूर), सांघिक नृत्य-पुष्पसेन सावंत ज्ञानपीठ (पणदूर), व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज (कुडाळ), हॉल्टिकल्चर कॉलेज (मुळदे). स्कीट स्पर्धा-प्लास्टिक (पंचम खेमराज, सावंतवाडी), असाही बॅरिस्टर (व्हिक्टर डॉन्टस लॉ कॉलेज कुडाळ), भाऊ (पुष्पसेन सावंत ज्ञानपीठ, पणदूर). तसेच मानाचा कॉलेज ऑफ द इयर पुरस्कार पुष्पसेन सावंत ज्ञानपीठ पणदूर महाविद्यालयास प्रदान करण्यात आला. सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. परीक्षक म्हणूननेहा कशाळीकर (ओरोस), उमेश माने (कुडाळ), डॉ. प्रणव प्रभू यांनी काम पाहिले. कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष आफरीन करोल, विकास कुडाळकर, अभय शिरसाट, श्रीराम शिरसाट, पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, भूपतसेन सावंत, मिलिंद परब, शैलेश घोगळे, अनुपसेन सावंत, अर्जुन परब, प्रदीप माने, रणजित रणसिंग, भगवान रणसिंग आदी मान्यवरांनी भेट देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
बक्षीस वितरण समारंभास बॅ. नाथ पै संस्थेचे उमेश गाळवणकर, प्रा. अरुण मर्गज, डॉ. दीपाली काजरेकर, चंद्रकांत काजरेकर, निमिष महाडेश्वर, प्रदीप माने, हेमंत जाधव मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मंडळाचे सदस्य जगन्नाथ गावडे, सचिन गुंड, सुशांत परब, प्रथमेश धुरी, गौरव मोडक, सुबोध परब, विनित परब, विवेक परब, सिद्धेश परब, दीपेश परब, ऋतिकेश परब, रोहन परब, राम बांदेलकर, अभय पाटील, समीर नाईक, वेदांत कुडतरकर, संदीप गावडे, प्रथमेश गावडे, विजय चव्हाण, चेतन राऊळ, शीतल पावसकर, हर्षद पालव यांनी मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com