मळगाव वाचनालयात 
मराठी भाषा गौरव दिन

मळगाव वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन

85915
मळगाव ः येथील खानोलकर वाचनालयात विजेत्या मुलांसोबत उपस्थित मान्यवर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

मळगाव वाचनालयात
मराठी भाषा गौरव दिन
बांदा ः मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात आयोजित निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक वैजनाथ देवण, बी. एस. राणे, वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, संचालक बी. एस. मुळीक, ऐक्यवर्धक संघांचे संचालक रमाकांत राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्‍घाटन झाले. ज्येष्ठ मराठी साहित्यिक तथा नाटककार वसंत कानेटकर यांच्या कादंबरी, ग्रंथांचे प्रदर्शन मांडले होते. वाचनालयात आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी देवण यांनी मराठी ही आपली मायबोली आहे. तिचे महत्त्व जाणून मराठी भाषा टिकविणे व समृद्ध करण्यासाठी आपण सर्वांनी विशेषतः तरुण पिढीने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष हेमंत खानोलकर यांनी आभार मानले. यावेळी ग्रामपंचायतीच्या देणगीतून मिळालेल्या यूपीएससी, एमपीएससी पुस्तकांचे देखील प्रदर्शन मांडण्यात आले.
---
85914
रोणापाल ः दयासागर छात्रालयात साहित्य वाटप करताना रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथचे पदाधिकारी.

रोणापाल छात्रालयास वस्तू
बांदा ः येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथतर्फे रोणापाल येथील दयासागर छात्रालय येथे भेट देऊन जीवनावश्यक, शालोपयोगी वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सहसचिव मिताली सावंत, शुभम केसरकर, रोहन कुबडे, मुईन खान, कौस्तुभ दळवी, गार्गी विर्नोडकर, साईस्वरूप देसाई, रोटरी क्लबचे रत्नाकर आगलावे, दयासागर छात्रालयचे व्यवस्थापक जीवबा वीर आदी उपस्थित होते. यावेळी मुलांनी विविध कथा व काव्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. यावेळी मयेकर यांनी रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ ही संघटना सामाजिक हित जपणारी संस्था आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य असल्याने या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम दयासागर छात्रलय करत आहे, असे गौरवोद्गार काढून भविष्यात या छात्रालयाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com