
जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा तारणहार ः शेखर निकम
rat२८३४.txt
बातमी क्र.. ३४ ( टुडे पान २ )
राजकारण, प्रसिद्धीपासून सतत दूर राहणारे नेतृत्व म्हणून शेखर सर सर्वांना ज्ञात आहेत. १९९५ ला शिवसेनेचे वादळ कोकणात असताना डेरवण पंचायत समिती गणात काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेविरोधात निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार म्हणून कोणी तयार होत नसल्याने गोविंदराव निकम साहेबांनी समोर पराभव दिसत असताना पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी शेखर निकम सर यांना पंचायत समिती निवडणूक लढवण्यास भाग पाडले; मात्र राजकारणाची मुळातच आवड नसल्याने शेखर सरांनी निकम साहेबांचा आदेश म्हणून निवडणूक लढवून पुन्हा आपल्या शिक्षणक्षेत्रात लक्ष केंद्रित केले. कृषी प्राचार्य ते सह्याद्री शिक्षणसंस्था कार्याध्यक्ष, अध्यक्षपदाची सूत्र घेत सह्याद्री शिक्षण वेलीचं वटवृक्षात रूपांतर करण्याकडे सरांनी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या या वाटचालीबद्दल ...
- संदीप घाग, सावर्डे
--
जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा तारणहार ः शेखर निकम
शेखर सरांनी शिक्षणाबरोबरच राजकारणात लक्ष द्यावे, असा गोविंदराव निकम साहेबांचा आग्रह होता. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात बॅकफूटवर जाताना दिसत होती. ती परिस्थिती पक्षासाठी विदारक होती. कोकणात पक्षाची स्थिती भक्कम करायची असेल तर भविष्याच्यादृष्टीने ठोस पावले उचलावी लागतील, हा विचार करून अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी शेखर सरांना न सांगताच त्यांची नेमणूक जाहीर केली आणि सरांचे खऱ्या अर्थाने राजकीय पदार्पण झाले. सुरवातीच्या काळात औपचारिकता पार करत एकेक दिवस सर पुढे ढकलत होते आणि जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका समोर येऊ घातल्या. तसं राजकारणात चार हात दूर राहणाऱ्या सरांनी मनावर घेतले आणि जिल्हा पिंजून काढला. जिल्ह्यातील शिवसेनेला नवीन आव्हान दिले. विजय हातातून निसटला; मात्र तळागाळाला गेलेल्या पक्षात ऊर्जितावस्था निर्माण केली; मात्र हे आपल्यामुळे झाले हे सांगण्यास कधीही पुढे आले नाहीत. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा तारणहार अशी सरांची ओळख, पक्षासाठी केलेले काम, दिलेला बहुमुल्य वेळ विचारत घेत अजितदादांनी सरांची वर्णी राज्य शिखर बँकेच्या संचालकपदी लावली; मात्र याच काळात चिपळूण तालुक्यातील पक्षांतर्गत बंडाळी, कलह यामुळे पुन्हा कार्यकर्ता होरपळून गेला असताना सर्वांना एका व्यासपीठावर आण्याची जबाबदारी सरांकडे येऊन ठेपली. चिपळूण-संगमेश्वर तालुक्यात १९९० पासून (३०) वर्षे काँग्रेस राष्ट्रवादी वर्चस्व कोलमडले असताना २०१५च्या विधानसभा निवडणूक लढवण्याची जबाबदारी सरावर येऊन ठेपली. सरांनी प्रामाणिक प्रयत्न केले; मात्र निसटता पराभव स्वीकारावा लागला. पराभव मनावर न घेता तब्बल चार वर्षे मतदार संघ पिंजून काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार, जयंत पाटील यांच्या सहकार्याने तसेच सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून चिपळूण-संगमेश्वर मतदार संघात पाणीप्रश्न, रस्ते, कार्यकर्त्यांना विश्वासात घेत मार्गी लावत आखणी केली. २०२०च्या निवडणुकीत यश मिळवून विजय प्राप्त केला. गेली ३ वर्षे सरकार स्थापन झाल्यापासून कोणतेही मंत्रिपद नसताना दोन तालुक्यांच्या विकासासाठी सतत धडपड करणाऱ्या शेखर निकम यांनी ''न भूतो न भविष्यती........'' असा विकासनिधी उपलब्ध करून दोन्ही तालुक्यांच्या विकासाला खऱ्या अर्थाने दिशा दिली आहे, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
---