
साफयिस्ट कंपनीविरोधात रिपब्लिकन सेनेचे उपोषण
rat२८१९.txt
बातमी क्र. .१९ (पान ५ साठी)
फोटो ओळी
- ratchl२८६.jpg ः
L८५७८२
चिपळूण ः आमरण उपोषणाला बसलेले रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी.
--
साफयिस्ट कंपनीविरोधात रिपब्लिकन सेनेचे उपोषण
चिपळूण, ता. २८ ः कंपनीचे दूषित पाणी उघड्यावर सोडले जात असताना आणि तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयिस्ट कंपनीविरोधात रिपब्लिकन सेना कमालीची आक्रमक झाली आहे. जिल्हाध्यक्ष मुजफ्फर उर्फ राजेश मुल्लाजी यांनी पुन्हा एकदा या विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधत चिपळुणातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर उपोषण छेडले.
कंपनीविरोधात योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सोमवारी रात्री उपोषण स्थगित करण्यात आले. साफयिस्ट कंपनीच्या मागील बाजूस कंपनीने दूषित पाणी खासगी प्लॉट खरेदी करून जमिनीत मुरवत आहेत. त्यामुळे जलप्रदूषण व जमिन मातीचे प्रदूषण होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांकडून करण्यात आला. यापूर्वी १५ ऑगस्ट २०१९ ला अशाच प्रदूषणाबाबत आमरण उपोषण करण्यात आले होते. पुन्हा कंपनीने तसेच प्रदूषण चालू केल्याचे फोटो व शूटिंगसह पुरावेदेखील आपल्याकडे असल्याचे रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष मुल्लाजी दावा करत आहेत. या संदर्भातील तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास एक महिन्यापूर्वी करण्यात आली होती; मात्र एमपीसीबी अधिकारी यांनी कोणतीही कारवाही केली नसल्यामुळेच सोमवारी (ता. २७) उपोषण छेडल्याची माहिती मुल्लाजी यांनी दिली. एमपीसीबी व साफयिस्ट कंपनीच्या म्हणण्यानुसार, दापोली कृषी विद्यापीठाने हे पाणी शेतमळीत सोडण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. कंपनीवर कारवाई करेपर्यंत उपोषण चालू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या उपोषणस्थळी रिपब्लिकन सेनेसह विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भेट दिली.