5 साखळी बंधाऱ्यामुळे सावर्डे परिसरात विहिरी जलमय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

5 साखळी बंधाऱ्यामुळे सावर्डे परिसरात विहिरी जलमय
5 साखळी बंधाऱ्यामुळे सावर्डे परिसरात विहिरी जलमय

5 साखळी बंधाऱ्यामुळे सावर्डे परिसरात विहिरी जलमय

sakal_logo
By

rat२८३३.txt

बातमी क्र.. ३३ ( टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat२८p४६.jpg ः
८५९२१
सावर्डे ः दहिवली खरवते येथील कापशी नदीवर आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर पद्धतीचे सिमेंट बंधारे बांधण्यात आले.
-rat२८p४७.jpg ः
८५९२२
बंधाऱ्याचे उद्घाटन करताना आमदार शेखर निकम आणि मान्यवर.
--
पाच साखळी बंधाऱ्याने सावर्डेतील विहिरी जलमय

आमदार निकम यांची दूरदृष्टी ; भाजीपाला, शेतीचे मळे तरारले

सावर्डे, ता. २८ ः कोकणातील पाणीटंचाईवर मात करायची असेल तर निसर्गनिर्मित पाणी साठवण केले पाहिजे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी याचा साठा केला तर पाणीटंचाई दूर होईल. या दूरदृष्टीने आमदार शेखर निकम यांनी शासनाच्या कृषी विभागास पाचारण करून कोल्हापूर पद्धतीचे सिमेंट बंधारे उभारण्याचा संकल्प केला. भूगर्भातील पाणीसाठा पावसाचे पाणी टिकवण्यासाठी सुरेख कल्पना व्यक्त केली. जमिनीच्या विशिष्ट खोलीवर पाणीप्रवाह चालू असतो. यासाठी कृषी विभागाची मदत घेतली. खरवतेच्या कापशी नदीपात्रात कोल्हापूर पद्धतीचे सिमेंट बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. स्वखर्चाने सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून शेखर निकम यांच्या कल्पनेतून ५ साखळी बंधारे साकारले. यामुळे परिसरातील गावात मार्च ते एप्रिल, मे महिन्यात आटून जाणाऱ्या विहिरी आता जलमय झाल्या आहेत.
सावर्डेसारख्या पाणीटंचाई असलेल्या भागात शेखर निकम यांच्या दूरदृष्टीने मुबलक पाणी मिळू लागले आहे. यासह त्यांच्या कल्पनेतून या परिसरात नदीचे खोलीकरणही त्यांनी करून घेतले. त्यासाठी लोकसहभागावर भर दिला अन् स्वःच्या पदराला खार लागली तरी पर्वा केली नाही. सावर्डे परिसरात बोअरवेलला पाणी मिळत नव्हते. आता या ठिकाणी २५ फुटावर बोअरिंगला पाणी मिळत आहे. त्यामुळे परिसरात भाजीपाला, शेतीचे मळे उभारून तरुणांना रोजगार उपलब्ध झाले आहेत.
कोकणच्या विकासाकरिता कृषीपदवीधर तरुण तयार झाले तर कोकणला लाभलेल्या अफाट निसर्गसंपत्तीचा फायदा होऊन कोकण सुजलाम्, सुफलाम् करता येईल या उदात्त हेतूनेच कृषी शिक्षणात आमुलाग्र बदल साधण्यासाठी शेखर सरांनी सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले होते. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या पदवी शिक्षणाचा पुरेपूर वापर करत खरवते कृषी शिक्षण देणारी चार महाविद्यालये आज दिमाखात सुरू आहेत.
---

सावर्डे शैक्षणिक हब
गोविंदराव निकम यांनी १९५७ ला सह्याद्री शिक्षणसंस्थेचे रोपटे लावले. या वृक्षाचे शेखर निकम यांनी सर्वांना बरोबर घेत आधुनिकीकरणाची कास धरत अल्पावधीत सह्याद्रीचा विस्तार करत वटवृक्षात रूपांतर केले. सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या समुहात ३३ माध्यमिक विद्यालये, प्राथमिक शाळा, आयटीआय, गोविंदराव निकम डिग्री कॉलेज फार्मसी {B. pharm}, डिप्लोमा फार्मसी, एमफार्म (M.pharm), सह्याद्री पॉलिटेक्निक, सह्याद्री आर्ट कॉलेज, इंग्रजी माध्यमाची शाळा, कला, विज्ञान महाविद्यालय, शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, जैव अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय अशी व्यवसायाभिमुख शिक्षणाची सुविधा सह्याद्रीच्या रूपाने जिल्ह्यात उभी राहिली. महाराष्ट्र राज्यात सह्याद्रीचा विस्तार पोहोचला व सावर्डे शैक्षणिक हब म्हणून नावारूपास आले.
---
कोट
रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार, शिक्षण, राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले असतानादेखील एमएससी अॅग्री पदवीनंतर करिअरच्या आरंभी स्वतःला राजकीय प्रवाहापासून कोसभर दूर ठेवत स्व. निकम साहेबांनी दहिवली-खरवते माळरानावर उभारलेल्या सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या कृषी विभागाकडे लक्ष केंद्रित करून सह्याद्री शिक्षणसंस्थेच्या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर केले.

- प्रा. सुमितकुमार पाटील, खरवते
---