दाभोळ-उत्तम संवाद कौशल्य आत्मसात करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-उत्तम संवाद कौशल्य आत्मसात करा
दाभोळ-उत्तम संवाद कौशल्य आत्मसात करा

दाभोळ-उत्तम संवाद कौशल्य आत्मसात करा

sakal_logo
By

उत्तम संवाद कौशल्य आत्मसात करा
डॉ. प्रमोद सावंत ; बेलोसे महाविद्यालयात पारितोषिक वितरण
दाभोळ, ता.२८ः गुणवंत विद्यार्थी आणि हिरा यांच्यात एक साधर्म्य आहे. ज्या मानकांचा उपयोग हिऱ्याचे मूल्यमापन करण्यासाठी केला जातो त्यांचाच विद्यार्थ्यांची गुणवत्ता मूल्यमापनासाठी केला जातो. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता विकासासाठी सकारात्मक ऊर्जा, प्रभावी व्यक्तिमत्व, चिकाटी हे गुण तर जीवनात यशस्वी होण्यासाठी सादरीकरण, देहबोली आणि उत्तम संवाद ही कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, असे मत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
दापोली येथील वराडकर -बेलोसे महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. या वेळी पारितोषिकांचे वितरण डॉ. प्रमोद सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी समारंभाच्या प्रास्ताविकात सर्वांचे स्वागत, पारितोषिक, विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व मराठी राजभाषा दिनानिमित्त कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे स्मरण केले. तसेच मराठी भाषा ही आपली मातृभाषा असल्याने तिचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले. महाविद्यालयातील विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमाच्या अहवालाचे वाचन अश्विनी करमरकर या विद्यार्थिनीने केले. शैक्षणिक उपक्रमांचा अहवाल प्रा. राजेंद्र देवकाते, सांस्कृतिक विभागाचा अहवाल प्रा. सिद्राया शिंदे तर जिमखाना विभागाचा अहवाल प्रा. सुरेश खरात यांनी सादर केला. संस्थेचे कार्यवाह डॉ. दशरथ भोसले व संचालिका सुनीता बेलोसे यांनी महाविद्यालयाने वर्षभरात आयोजित केलेल्या अनेकविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. संस्था सभापती शिवाजी शिगवण यांनी ‘मन में है विश्वास’ या विश्वास नांगरे पाटील लिखित पुस्तकाचा दाखला देऊन विद्यार्थ्यांनी मनापासून व अपार कष्ट करावेत. यश नक्की मिळतेच, असे सांगितले. मंचावर उपसभापती प्रियदर्शन बेलोसे, अनंत सणस, धनंजय यादव, सुनील चव्हाण, सुनील पुळेकर आदी उपस्थित होते.