
रत्नागिरी-क्राईम
rat2835. txt
बातमी क्र..35 (पान 3 साठी)
जाकादेवीत पादचारी महिलेला दुचाकीची धडक
रत्नागिरी ः तालुक्यातील जाकादेवी-बाजारपेठ येथे निष्काळजीपणे दुचाकी चालवून पादचारी महिलेला मागून धडक देणाऱ्या स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाग (पूर्ण नाव माहीत नाही) असा संशयित आहे.
ही घटना रविवारी (ता. 26) सकाळी 6 वा. घडली. संशयित दुचाकी (एमएच-08-एबी-2520) घेऊन जाकादेवी ते खंडाळा असा भरधाव वेगाने जात असताना जाकादेवी बसस्टॉपुढे किंजळेपुढे जाणाऱ्या पादचारी महिला कल्पना बाळू चव्हाण (वय 50, मुळ रा. पन्हाळगड, कोल्हापूर, सध्या रा. जाकादेवी, रत्नागिरी) यांना पाठीमागून धडक दिली. यात महिलेच्या उजव्या पायाला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी दाखल करून खबर न देता निघून गेला. या प्रकरणी कल्पना चव्हाण यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत
---------
मिरकरवाड्यातील खलाशाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः शहराजवळील भगवतीबंदर येथील समुद्रात मच्छिमारीसाठी बोटीवर गेलेल्या वृद्ध खलाशाला अचानक उलटी झाली. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. द्वारिका लालबहादूर थारू (वय 66, मुळ रा. नेपाळ, सध्या रा. मिरकरवाडा जेटी, रत्नागिरी) असे मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. 27) सकाळी दहाच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनसार, द्वारिका थारू नूरमोहम्मद-3 नावाच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. रविवारी (ता. 26) सायंकाळी साडेसहा वाजता बोट मच्छिमारीसाठी लाईट हाऊससमोर 30 वाव खोल समुद्रात गेली होती. सोमवारी पहाटे चार वा. रापण मारत असताना द्वारिका थारूला अचानकपणे उलटी झाली. त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी थारूला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
-------
---------
ऑपरेटर...बातमीदार...पांचाळ.....28.2.23....................