शिवसेनेची पाळेमुळे उपटण्याची कोणाची हिंमत नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेची पाळेमुळे उपटण्याची कोणाची हिंमत नाही
शिवसेनेची पाळेमुळे उपटण्याची कोणाची हिंमत नाही

शिवसेनेची पाळेमुळे उपटण्याची कोणाची हिंमत नाही

sakal_logo
By

rat२८३६.txt

बातमी क्र.. ३६ (पान ३ साठीमेन)

फोटो ओळी
-rat२८p४९.jpg-
८५९३१
रत्नागिरी ः ठाकरे सेनेच्या शिवगर्जना मेळाव्याप्रसंग स्वयंवर मंगल कार्यालय तुडुंब भरले होते.
--

मुंबई महानगरपालिकेच्या ठेवीवर भाजपचा डोळा

मिनाताई कांबळे ; शिवगर्जना अभियान मेळावा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः मराठी माणसाच्या अस्मितेसाठी (कै.) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ ला शिवसेना पक्षाचे रोपटे लावले. त्याला आता ५६ वर्षे झाली असून या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. त्याची पाळेमुळे खोलवर रूजली आहेत. ती उपटण्याची कोणाचीही हिंमत नाही. सेनेच्या मुळावर उठून आम्हाला डिवचण्याचे काम केले आहे. आता मधमाशांच्या पोळ्यांप्रमाणे तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भित इशारा शिवसेनेच्या उपनेत्या मिनाताई कांबळे यांनी विरोधकांना दिला.
शिवगर्जना अभियानांतर्गत आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, भाजप हे शिवसेनेतून फुटून गेलेल्यांची जेव्हा गरज संपेल, तेव्हा त्यांना बाजूला करतील. त्यावेळी शिवसेनेत काय किंमत आणि सन्मान होता हे लक्षात येईल. आताचा सत्तासंघर्षाचा प्रकार पाहून जनता नाराज आहे. ती निवडणुकीची वाट पाहात आहे; परंतु या डरपोक लोकांची निवडणूक घेण्याची हिंमत नाही. महागाईच्या भस्मासुराने जनेतला हैराण केले आहे; परंतु भाजप महागाई संपवायला नाही तर सेनेला संपवायला आली आहे. मुंबई महापालिकेच्या ठेवींवर त्यांचा डोळा आहे; परंतु शिवसेना आगामी निवडणुकीत पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेईल.
तालुकाप्रमुख बंड्या साळवी म्हणाले, राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगला सोडायला लागला. या वेळी संपूर्ण जनतेच्या डोळ्यात पाणी आले. आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. जिल्हाप्रमुख विलास चाळके म्हणाले, राज्यात २० जूनला राजकीय संघर्ष पेटला. उद्वव ठाकरे यांनी केलेल्या चांगल्या कामाचा विरोधकांना पोटशूळ उटला. त्यामुळे भाजपने कारस्थान सुरू केले. त्यात आमच्या ४० आमदारांनी गद्दारी केली; परंतु त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरेंना यश मिळाले. त्यामुळे पुन्हा भाजपची पोटदुखी वाढली. त्यानंतर चिन्ह गोठवले. परंतु पेटून उठलेला हा शिवसैनिक ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
--

मैदानात उतरून कृती करा

शिवसेनेवर किती संकटे आले तर ठाकरेंचा भगवा फडकत राहणार आहे. पक्षांनी ज्यांच्या घरावर सोन्याची कौले घातली ते गद्दार निघाले; परंतु ज्यांच्या घरावर पत्रे घातले ते शिवसैनिक निष्ठावंत निघाले. हे सर्व मावळे ठाकरेंच्या मागे ठाम उभे आहेत. निवडणुकीत त्यांना सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही. कोणतीही जबाबदारी द्या ती पूर्ण ताकदीने पूर्ण करू; परंतु आता व्हॉट्सअॅपवर नको तर मैदानात उतरून कृती करा, असा सल्ला शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष राजेंद्र महाडीक यांनी दिला.