
रत्नागिरी- धाडसी शिबिराला सुरवात
-rat28p51.jpg- rat28p51 रत्नागिरी ः एसएनडीटी विद्यापीठ व महर्षी कर्वे संस्था आयोजित क्रीडाशिबिराचे उद्घाटन करताना प्रकल्पप्रमुख मंदार सावंतदेसाई. सोबत मिलिंद तेंडुलकर, बिना पंड्या, स्नेहा कोतवडेकर, अरविंद नवेले, स्वप्नील सावंत आदी.(मकरंद पटवर्धन : सकाळ छायाचित्रसेवा)
एसएनडीटीच्या धाडसी क्रीडा शिबिराला प्रारंभ
रत्नागिरी, ता. २८ ः एसएनडीटी महिला विद्यापीठाचा शारीरिक शिक्षण विभाग आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षणसंस्थेच्या शिरगाव येथील बीसीए कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आजपासून धाडसी क्रीडा शिबिराला रत्नदुर्ग किल्ल्यावर प्रारंभ झाला. शिरगाव प्रकल्पाचे प्रमुख मंदार सावंतदेसाई यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन श्रीफळ वाढवून करण्यात आले.
उद्घाटन कार्यक्रमाला शारीरिक शिक्षण विभागप्रमुख बिना पंड्या, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत, प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, मिलिंद तेंडुलकर, जिद्दी माउंटेनिअर्सचे अरविंद नवेले व दहा प्रशिक्षित सहकारी आदी उपस्थित होते. हे शिबिर तीन दिवस चालणार असून, यामध्ये व्हॅली क्रॉसिंग, रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गुहेत प्रवेश करणे, रॅपलिंग आदी धाडसी प्रकार शिकवण्यात येणार आहेत. या शिबिरामध्ये रुईया कॉलेज, माटुंगा होमसायन्स कॉलेज, आर्टस् अॅंड कॉमर्स चर्चगेट कॉलेज, नानावटी कॉलेज, एम. डी. शाह कॉलेज आणि महर्षी कर्वे संस्थेचे बीसीए कॉलेज यामधील विद्यार्थिनी सहभागी झाल्या आहेत. मंदार सावंतदेसाई यांनी शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. रत्नदुर्ग किल्ल्यावर हे शिबिर होत असून, गेल्या आठवड्यात प्रचंड उष्णता होती; पण आता वातावरण सर्वसाधारण झाले आहे. त्यामुळे तुम्ही या शिबिरात अनेक नवनवीन धाडसी क्रीडाप्रकार आनंदाने शिका, असे सांगितले.