कुडाळ नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुडाळ नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर
कुडाळ नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर

कुडाळ नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर

sakal_logo
By

कुडाळ नगरपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर
कुडाळ, ता. २८ ः येथील नगरपंचायतीचा एकूण महसुली खर्च ६ कोटी ६६ लक्ष ४७ हजार ३०६ आहे. प्रारंभिक शिल्लक २२ कोटी ४१ लक्ष ४ हजार ८६१ रुपये असलेला शिलकी रकमेचा अर्थसंकल्प सर्वानुमते संमत करण्यात आला, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी दिली.
नगरपंचायतीच्या विशेष सभेत नागरिकांना देण्यात येणान्या सुविधांबरोबरच आरोग्य, पाणी, स्वच्छता, महिला व बालकल्याण तसेच नागरिकांसाठी तरतूद केलेला २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे शिलकी रक्कमेचे अंदाजपत्रक नगराध्यक्षा आफरीन करोल यांनी सभागृहात सादर केले. हे अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
कुडाळ नगरपंचायतीची विशेष सभा आज नगराध्यक्ष करोल यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात झाली. यावेळी उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, सर्व नगरसेवक, सर्व नगरसेविका, मुख्याधिकारी सूरज कांबळे, प्रशासकीय अधिकारी गीतांजली नाईक व सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. अर्थसंकल्पाचे वाचन लेखापाल स्वप्नील पाटील यांनी केले. या अंदाजपत्रकाची प्रारंभिक शिल्लक २२ कोटी ४१ लक्ष ४ हजार ८६१ रुपये एवढी दाखविण्यात आली. तर एकूण महसुली जमा ६ कोटी ७० लाख ८० हजार ७०० दाखविण्यात आली. एकूण महसुली खर्च ६ कोटी ६६ लाख ४७ हजार ३०६ आहे. अशाप्रकारे शिलकी रक्कमेचा अर्थसंकल्प सर्वानुमते संमत करण्यात आला. या अर्थसंकल्पात हायमास्ट खरेदी, पाणी योजना, सक्शन मशिन, रस्ता दुरुस्ती, नवीन वाहन खरेदी, बायोगॅस प्लॅन्ट, नवीन उद्यान, शहर विकासासाठी तरतूद केल्याची माहिती मुख्याधिकारी कांबळे यांनी दिली.