आंबेरीत अवैध वाळूचे तीन डंपर ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेरीत अवैध वाळूचे 
तीन डंपर ताब्यात
आंबेरीत अवैध वाळूचे तीन डंपर ताब्यात

आंबेरीत अवैध वाळूचे तीन डंपर ताब्यात

sakal_logo
By

85942

आंबेरीत अवैध वाळूचे
तीन डंपर ताब्यात
मालवण : वाळू उत्खननास परवानगी मिळाली असली तरी तालुक्यातील खाडीपात्रात अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतूक सुरूच आहे. तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाकडून होणाऱ्या सततच्या कारवाईतून अनधिकृत वाळू उत्खनन वाहतूक सुरूच असल्याचे स्पष्ट होत आहे. सोमवार (ता. २७) रात्री तहसीलदार पाटील यांनी बावखोल मार्गावर अनधिकृत वाळू वाहतूक करणारे दोन वाळू वाहतूक डंपर पकडले, तर आंबेरी खाडी किनारी अनधिकृत वाळू उत्खननाच्या ठिकाणी तहसीलदारांचे पथक पोहोचताच वाळू उत्खनन करणाऱ्या कामगारांनी होड्यांसह पळ काढला. याच ठिकाणी वाळू भरणा असलेला एक डंपर सापडून आला. पुढील कारवाईसाठी तिन्ही डंपर तहसील कार्यालय येथे आणण्यात आले. पुढील कार्यवाही सुरू होती.