
रत्नागिरी-कवी अरुण मोर्येंच्या कवितासंग्रहांचे प्रकाशन
-rat28p52.jpg-KOP23L85933
रत्नागिरी ः कवी अरुण मोर्ये यांच्या ओंजळभर शब्दफुले या कविता संग्रहाचे प्रकाशन करताना मान्यवर.
------
कवी अरुण मोर्येंच्या
कवितासंग्रहांचे प्रकाशन
रत्नागिरी ः कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्तीचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा कवी गझलकार नाट्य लेखक व तरुण साहित्यिक कवी अरुण तुकाराम मोर्ये यांच्या ओंजळभर शब्दफुले या कवितासंग्रहाचे नुकतेच उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन तथा जिल्हा मराठी भाषा समितीच्या सदस्य सचिव शुभांगी साठे यांच्या हस्ते झाले.
मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारक येथे या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा मराठी भाषा रत्नागिरी, कोकण मराठी साहित्य परिषद आणि माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम झाला. प्रस्तावना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी लिहिली आहे. कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा मराठी भाषा समितीचे सदस्य गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांनी कवितांच्या माध्यमातून अरुण मोर्ये यांनी समाजमनामध्ये उमटणाऱ्या भावना रेखाटल्या असून, या कवितांच्या माध्यमातून समाजमनाचे प्रतिबिंब दिसत असल्याचे मत व्यक्त केले.