
पावस-उर्दू विषयात प्रथम आलेल्या झुलेखाचा बोर्डातर्फे गौरव
फोटो ओळी
-rat२८p५४.jpg-KOP२३L८५९३५
रत्नागिरी ः उर्दू विषयात ९८ टक्के गुण मिळवून अव्वल आलेल्या झुलेखा काझी हिचा सत्कार करताना लाईकशेठ फोंडू आणि मान्यवर.
----
उर्दू विषयात प्रथम आलेल्या
झुलेखाचा बोर्डातर्फे गौरव
पावस, ता. २८ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२२ च्या दहावी बोर्ड परीक्षेत झुलेखा दाऊद काझी हायस्कूल पावसची सबरीना सोलकर ही विद्यार्थिनी उर्दू विषयामध्ये ९८ गुण मिळवून कोकण डिव्हिजन बोर्डात विषय प्रथम आली होती. तिला बोर्डाच्या वतीने एक हजाराचा धनादेश व अभिनंदन पत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका साजिदा बिजापुरी, सहकारी शिक्षक तसेच संस्थेचे अध्यक्ष जावीद काजी, उपाध्यक्ष लाईकशेठ फोंडू यांनी सबरीना सोलकर या विद्यार्थिनीचे तसेच विषय शिक्षक अजमल मुल्ला यांचे अभिनंदन केले.