दाणोली येथे ९ मार्चला
साटम महाराज पुण्यतिथी

दाणोली येथे ९ मार्चला साटम महाराज पुण्यतिथी

85957
श्री साटम महाराज

दाणोली येथे ९ मार्चला
साटम महाराज पुण्यतिथी
ओटवणे, ता. २८ ः दाणोली येथील साटम महाराजांचा ८६ वा पुण्यतिथी सोहळा ९ मार्चला होत आहे. त्यानिमित्त समाधी मंदिरात विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे साडेचारला काकड आरती, सकाळी पाचला अभ्यंगस्नान, सातला श्री. कल्याणकर बुवा (मुंबई) यांचे सुश्राव्य कीर्तन, आठला सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्या हस्ते साटम महाराज समाधी पूजन व विधीवत पाद्यपूजा, नऊला श्री. घाटकर (कोलगाव) यांचे बासरी वादन, सकाळी दहाला श्रीराम झारापरकर यांचे कीर्तन, दुपारी बाराला महाआरती, साडेबाराला श्री. सामंत बुवा (झाराप) यांचे भजन, त्यानंतर महाप्रसाद, दीडला राधाकृष्ण संगीत साधना विणाताई दळवी प्रस्तुत अभंग व भक्तिगीतांचा सुरेख नजराणा, तीनला श्री. गावडे (सावंतवाडी) यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी चारला श्री. नातू बुवा (पुणे) यांचे कीर्तन, सातला आरती, साडेसातला दाणोली हायस्कूल व प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री साडेआठला सवाद्य पालखी मिरवणुकीला प्रारंभ, दोनला आजगावकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. महाराजांच्या निवासस्थानीही भजन, कीर्तन होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत तथा श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त खेमसावंत भोसले, विश्वस्त युवराज लखमसावंत यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com