
गीतगायन स्पर्धेत गौरी, स्वरा, आर्या प्रथम
85958
कांदळगाव ः येथे गीतगायन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
गीतगायन स्पर्धेत गौरी, स्वरा, आर्या प्रथम
कांदळगावातील स्पर्धा; प्राथमिक, माध्यमिक शाळांचा सहभाग
मालवण, ता. २८ ः कांदळगाव येथे आयोजित तालुकास्तरीय गीतगायन स्पर्धेत विविध गटात गौरी वस्त, स्वरा आचरेकर, आर्या आचरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांदळगाव नंबर १ च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बेस्ट-हनुमान व्यायाम शाळा कांदळगाव यांच्यावतीने दरवर्षी घेण्यात येणारी प्रतिष्ठेची (कै.) दिनकरराव दौलतराव राणे स्मृती तालुकास्तरीय शालेय गीतगायन स्पर्धा कांदळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे झाली. सुप्रसिद्ध मराठी संगीत नाटककार (कै.) विद्याधर गोखले जन्मशताब्दी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या या अठराव्या तालुकास्तरीय शालेय गीतगायन स्पर्धेमध्ये तालुक्यातील अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये एकूण ४६ विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. गट क्रमांक १-पहिली ते चौथी या गटात प्रथम- गौरी वस्त, (मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा मालवण), द्वितीय- दूर्वा राणे, (भंडारी एज्युकेशन सोसायटीज हायस्कूल प्राथमिक शाळा), तृतीय- मीरा वराडकर आणि उत्तेजनार्थ प्रांजल तेरसे (मोहनराव परूळेकर प्राथमिक शाळा मालवण). गट क्रमांक २- पाचवी ते सातवी या गटात प्रथम- स्वरा आचरेकर, (न्यू इंग्लिश स्कूल आचरे), द्वितीय- सारा शारबिद्रे, (जयगणेश इंग्लिश मिडीयम स्कूल मालवण), तृतीय- तन्मय मेस्त्री, (प्राथ. शाळा मसुरे देऊळवाडा) आणि उत्तेजनार्थ चैतन्य भोगले (केंद्र शाळा मसुरे नं.१), गट क्रमांक ३-आठवी ते दहावी प्रथम आर्या आचरेकर (न्यू इंग्लिश स्कूल आचरे), द्वितीय- पारस सांबारी (कावले इंग्लिश मिडीयम स्कूल आचरे), तृतीय- भूमी नाबर( इंग्लिश स्कूल आचरे) आणि उत्तेजनार्थ श्रेया गावडे, (जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल मालवण). यशस्वी स्पर्धकांना गौरविण्यात आले. याप्रसंगी स्पर्धा पुरस्कर्ते नंदकुमार राणे, शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत पारकर, सचिव पांडुरंग राणे, उपाध्यक्ष सत्यवान परब, सुधाकर राणे, ओझर विद्यामंदिरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एस. परब, कांदळगाव सरपंच रणजित परब, कुडाळ येथील परीक्षक प्रफुल्ल रेवंडकर, बेस्ट शिव- हनुमान व्यायामशाळा कांदळगावचे अध्यक्ष उमेश कोदे, मुख्याध्यापिका श्रीमती इजाबेल फर्नांडीस आदी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा कांदळगाव नंबर १ ची शतकोत्तर सुवर्ण महोत्सव समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ आणि ग्रामपंचायत कांदळगाव यांचे बहुमोल सहकार्य लाभले. संगीत साथ आदर्श संगीत विद्यालयाचे संचालक मंगेश कदम, वैभव मांजरेकर, विजय बोवलेकर, विनोद सातार्डेकर यांनी केली. सूत्रसंचालन प्रवीण पारकर यांनी केले. अर्चना कोदे, श्रीराम परब, आशिष आचरेकर यांनी सहकार्य केले.