पावशीतील महिलेवर मारहाणप्रकरणी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावशीतील महिलेवर
मारहाणप्रकरणी गुन्हा
पावशीतील महिलेवर मारहाणप्रकरणी गुन्हा

पावशीतील महिलेवर मारहाणप्रकरणी गुन्हा

sakal_logo
By

पावशीतील महिलेवर
मारहाणप्रकरणी गुन्हा
कुडाळ, ता. २८ ः चुलीजवळ लाकडे टाकली म्हणून शारदा शंकर वर्दम (वय २३, रा. पावशी देऊळवाडी) यांच्यासह त्यांच्या आईला मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच पद्मावती रमेश वर्दम हिच्यावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना पावशी-देऊळवाडी येथे घडली.
याबाबत शारदा वर्दम यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, त्यांच्या आजीने घराच्या मागे असलेल्या जंगलमय भागातून लाकडे आणली. ती लाकडे घराच्या बाहेर असलेल्या आंघोळीचे पाणी गरम करण्यासाठी असलेल्या चुलीजवळ टाकली. या रागातून पद्मावती वर्दम हिने शारदा यांना लाकडाच्या भेताळ्याने मारहाण केली. तिला सोडवण्यासाठी घरातून धावत आलेल्या त्यांच्या आईला सुद्धा पद्मावती हिने मारहाण केली. या तक्रारीनुसार पद्मावती वर्दम हिच्या विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.