पान एक-सावंतवाडीतील तरुण गोव्यात गांजासह जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान एक-सावंतवाडीतील तरुण
गोव्यात गांजासह जेरबंद
पान एक-सावंतवाडीतील तरुण गोव्यात गांजासह जेरबंद

पान एक-सावंतवाडीतील तरुण गोव्यात गांजासह जेरबंद

sakal_logo
By

पान एक

85976

सावंतवाडीतील तरुण
गोव्यात गांजासह जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखेची पेडणेत कारवाई
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २८ ः पेडणे येथे गोवा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात सुमारे अडीच किलो गांजासह सावंतवाडीतील तरुणाला अटक केली. ही कारवाई आज एका रेस्टॉरंटमध्ये केली. सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षांत ठिकठिकाणी केलेल्या कारवाईत गांजासाठा सापडत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील हा छापा लक्षवेधी ठरला आहे.
सिंधुदुर्गात गेल्या दीड वर्षात गांजा सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने केलेल्या विविध छाप्यामध्ये गांजा सापडल्याच्या घटना वाढल्या आहेत. अगदी ग्रामीण भागातही याचे लोण पसरले आहे. असे असले तरी अमली पदार्थांच्या या वाढलेल्या प्रस्थाच्या मुळापर्यंत जाण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग हद्दीपासून जवळ असलेल्या पेडणेमध्ये गोवा पोलिसांनी सावंतवाडीतील तरुणाला पकडल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गोवा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक लक्शी आमोनकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाला पेडणेतील एका फॅमिली रेस्टॉरंटमध्ये गांजा संदर्भात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची टीप मिळाली. त्यांनी छापा टाकला असता नासीरहुसेन (वय २३ रा. माठेवाडा, सावंतवाडी) हा तरुण संशयास्पदरीत्या सापडला. त्याच्याकडे सुमारे अडीच किलो गांजा आढळून आला. गांजासह त्याच्याकडून दोन लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक अधीक्षक सूरज हळणकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. आमोणकर व दिनेश गडेकर हे करत आहेत. याबाबत अधिक तपास पेडणे पोलिस करीत असून, संशयित हुसैन याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्याकडून दुचाकी व अन्य साहित्य जप्त केले.